तरुण भारत

शेवटच्या मिनिटाला स्वयंगोल, चेन्नई पराभूत

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : जमशेदपूर एफसीला सुदैवाची साथ, चेन्नईचा बचावपटू सिपोव्हिचचा स्वयंगोल

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

बचावपटू सिपोव्हीच याच्याकडून शेवटच्या मिनिटाला झालेल्या सॅल्फ गोलमुळे चेन्नईन एफसीला काल जमशेदपूर एफसी संघाकडून एकमेव गोलने पराभूत व्हावे लागले. आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील काल हा सामना बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आला.

या विजयाने जमशेदपूर एफसीला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 17 सामन्यांतून पाच विजय आणि प्रत्येकी सहा बरोबरी आणि पराभवाने आता 21 गुण झाले आहेत. सहावा पराभव स्वीकारलेल्या चेन्नईन एफसीचे आता 17 सामन्यांतून तीन विजय, आठ बरोबरी आणि सहा पराभवाने 17 गुण झाले आहेत. आयएसएलच्या गुणतक्यात आता जमशेदपूर एफसीचा संघ सहाव्या तर चेन्नईन एफसीचा संघ आठव्या स्थानावर आहे.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला चेन्नईन एफसीने धोकादायक चाल रचली. यावेळी मेमो मौरा याने दिलेल्या पासवर लालियानझुआला छांगटेने हाणलेला फटका जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने तत्परतेने अडविला. त्यानंतर दोन्ही संघांचा खेळ मध्यभागीच झाला. सामन्याच्या 30व्या मिनिटाला परत एकदा चेन्नईनने जमशेदपूर एफसीची बचावफळी भेदली. यावेळी मेमो मौरा आणि लालियानझुआला छांगटेने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर रहीम अलीचा गोल करण्याचा गोल करण्याचा यत्न दिशाहीन ठरला.

जमशेदपूर एफसीला पहिल्या सत्रात एकदाच गोल करण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्यांच्या फारुख चौधरीने मारलेला शॉट चेन्नईन एफसीचा गोलरक्षक विशाल कैथने अडविला आणि संघावर होणारा गोल टाळला. दुसऱया सत्रात सुद्धा विशेष असा आक्रमक खेळ झाला नाही. सामन्याच्या 53व्या मिनिटाला जमशेदपूरच्या आयतॉर मॉनरॉयच्या पासवर डॅनीयल ग्रँडने गमविली.

त्यानंतर 59व्या मिनिटाला आयतॉर मॉनरॉयने मारलेली शूट चेन्नईन एफसीचा गोलरक्षक विशाल कैथने आपल्या उजव्या बाजूने झेपावत अडविली. शेवटच्या तीस मिनिटांत उभय संघांनी बदल केले, मात्र बदली खेळाडू विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. जमशेदपूर एफसीच्या आलेक्सझांडर लिमा याचाही गोल करण्याचा यत्न विशाल कैथने अडविल्यानंतर मॉनरॉयचाही गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला.

सामना गोलबरोबरीत राहणार असे वाटत असताना जमशेदपूर एफसीने विजयी गोल सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला नोंदविला. डॅवीड ग्रँडने मारलेला फटका अडविण्याच्या यत्नात चेन्नईनचा बचावपटू सिपोव्हीचने स्वताच्याच जाळीत मारून सॅल्फ गोलची नोंद केली. यावेळी चेन्नईन एफसीचा गोलरक्षक विशाल कैथला चेंडू अडविण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या सामन्यात दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण मिळणार असे वाटत असताना या गोलने जमशेदपूर एफसीला तीन गुणांची कमाई करून दिली. जमशेदपूर एफसीच्या बचावफळीत सुरेख खेळी केलेल्या स्टीफन इझे याला सामनावीराचा पुरस्कार व रोख 50,000 प्राप्त झाले.

Related Stories

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर कोविड केअर सेंटर

tarunbharat

कोविड काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱया काँग्रेस मंडळाध्यक्षाचे बैठकीत कौतुक

Patil_p

दहावी परीक्षांचे वेळापत्रक दहा दिवस अगोदर जाहीर करणार

Patil_p

‘ओरा डायमंड’च्या कुडचडेतील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

कोळंब – काणकोण किनारी भागात 77 कुटिरे, 6 उपाहारगृहे हटविली

Patil_p

वीज बिलांतील 50 टक्के सवलत हा निष्काळजीपणे घेतलेला निर्णय

Patil_p
error: Content is protected !!