तरुण भारत

बेळगाव जिल्हा स्केटिंगपटूंची निवड

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग निवड चाचणी घेण्यात आली. सदर निवड चाचणीत रिंक रेस, रोड रेस, रोलर हॉकी, इनलाईन हॉकी, फ्रिस्टाईल व आर्टिस्ट या सर्व गटातील स्केटिंगपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. सदर निवड चाचणी केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या तर रोड रेसची निवड चाचणी सुरेश अंगडी बॉईज हॉस्टेलजवळील रोडवर घेण्यात आली. 13 फेब्रुवारी रोजी रोड रेस इनलाईन सकाळी 6.30 वा. तर स्कॉड रिंक स्पर्धा गोवावेस रिंकवर घेण्यात येणार आहे. इच्छुक सर्व क्लब्सनी बोनाफाईड सर्टिफिकेटसह प्रसाद तेंडुलकर यांच्याकडे 11 फेब्रुवारीपूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

महापालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

सरकारी नियमानुसारच आमच्याकडून रक्कम घ्या

Patil_p

बेंगळूर: जलद प्रतिजैविक चाचणी अहवालांपैकी ९.४१ टक्के पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

हिडकलमधून 6.80 टीएमसी पाणी कालव्याला

Omkar B

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय

Patil_p
error: Content is protected !!