तरुण भारत

आविष्कार फौंडेशनचा शिक्षक पुरस्कार चिगुळकर यांना प्रदान

वार्ताहर / कणकुंबी

आविष्कार फौंडेशन इंडियातर्फे दरवर्षी जागतिक शिक्षक दिनाच्यानिमित्ताने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक व कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे खानापूर तालुका अध्यक्ष एस. जी. चिगुळकर यांना नुकताच गोवा येथील कार्यक्रमात देण्यात आला.

Advertisements

देशभरातील सुमारे दहा राज्यातून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा गोवा, मडगाव, येथील रविंद्रभवन येथे रविवार दि. 7 फेब्रुवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आविष्कार फौंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संजय पवार होते. माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी देशातील आसाम, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा आणि राज्यातील सुमारे चाळीस शिक्षकांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आविष्कार, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन केले होते. त्यासाठी कर्नाटक राज्यातून कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा (मुंबई) श्रीमती सोनाली कपूर व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले

व्यासपीठावर सत्यन जगन्नाथन आणि प्रेरणा कपूर (दुबई), कोल्हापूर जिल्हा शिक्षणाधिकारी किरण लोहार, आविष्काराच्या दक्षिण भारत प्रमुख श्रीमती उज्ज्वला सातपुते, आविष्कार फौंडेशनचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सेक्रेटरी सुभाष बराटे तसेच आसाम, आंध्र, तेलंगणा व इतर राज्यातील संघटनेचे प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी एस. जी. चिगुळकर यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. सुनिता चिगुळकर, संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळळी, जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, सेक्रेटरी सुभाष बराटे, विश्व भारत सेवा संस्थेतील विविध शाखांचे प्रमुख मुख्याध्यापक, बेळवट्टीचे ग्रा. पं. माजी अध्यक्ष भुजंग गाडेकर, ता. पं. सदस्य एन. के. नलवडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. एस. जी. चिगुळकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

वाहतूक रोखण्यासाठी संपर्क रस्त्यांवर झाडांचा वापर

tarunbharat

विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Omkar B

नियम उल्लंघनप्रकरणी 80 हजाराचा दंड वसूल

Amit Kulkarni

आणखी एका ग्राहकाचे 1 लाख 60 हजार लांबविले

Patil_p

आराम बसच्या दरात विमान प्रवास

Patil_p

अगरबत्ती कारखान्याला आग

Rohan_P
error: Content is protected !!