तरुण भारत

‘हा देश फक्त चार लोक चालवतात’, लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असे सांगत हा देश केवळ चार लोक चालवत असल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली.

Advertisements


राहुल गांधी म्हणाले की, पहिल्या कृषी कायद्यामध्ये बाजारसमित्या बंद करण्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या कृषी कायद्यात कोणताही उद्योजक हवे तेवढे धान्य, फळ आणि भाजीची साठवणूक करु शकतो. साठेबाजीला प्रोत्साहन देणे हे या कायद्याचे लक्ष्य आहे. तर तिसऱ्या कायद्यात जर एखाद्या शेतकऱ्यांने देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाकडे भाजी आणि धान्यासाठी योग्य दर मागितला तर त्याला न्यायालयात जाण्यास परवानगी नसेल.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना बुधवारी (10 फेब्रुवारी) म्हटले होते की, तीनही कृषी कायद्यांचा विषय आणि उद्देश यावर चर्चा झालेली नाही. त्याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे.

  • ‘हम दो हमारे दो’चे सरकार


राहुल गांधी म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी कुटुंबनियोजनाचा नारा होता की हम दो हमारे दो. जसा कोरोना आता वेगळ्या रुपात आला आहे, त्याचप्रकारे हा नाराही दुसऱ्या स्वरुपात आला आहे. हा देश चार लोक चालवतात. प्रत्येकाला त्यांची नावे माहित आहेत. हम दो हमारे दो हे कोणाचे सरकार आहे.


राहुल गांधी पुढे म्हणाले की, हम दो हमारे दो…सगळ्यांना लक्षात असेल तो फोटो होता… चार क्यूट चेहरे, सुंदर चेहरे, मोठमोठे चेहरे. यावरुन संसदेत गदारोळ सुरु होता.


जेव्हा हा कायदा लागू होईल तेव्हा या देशातील शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडेल. शेतकऱ्यांचे शेत जाईल, त्याला दर मिळणार नाही. छोट्या दुकानदारांची दुकाने बंद होतील आणि केवळ ‘दो हम और हमारे दो’ हा देश चालवतील.

Related Stories

“भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात?”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

Abhijeet Shinde

मणिपूरमध्ये काँग्रेसचा बुरुज ढासळला

Patil_p

अयोध्येतील राम मंदिराच्या नकाशाला प्राधिकरणाची मंजुरी

datta jadhav

गो-तस्करी प्रकरणी तृणमूल नेत्यावर वॉरंट

Patil_p

म्हणून बनविली इलेक्ट्रिक सायकल

Patil_p

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारी तिजोरीतून 6 कोटी!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!