तरुण भारत

करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर

करमाळा / प्रतिनिधी 

आगामी  पंचायत समिती व जिल्हा परिषदा निवडणुकांच्या  दृष्टीने गटातटाने  ग्रामपंचायत निवडणूका पासूनच मोर्चेबांधणीस सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी बालेकिल्ला  दिग्गगजांना मतदाराने पराभूत केले, काही  ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी  जुन्यांना पुुुन्हा  संधी मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे, हेच गटातटाची व्युहरचना असल्याचे बोलले जात आहे. 
 करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका आज (ता.११) विविध गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात शांततेत पार पडल्या आहेत. सरपंच पदाच्या काही ठिकाणी निवडणुक झाली तर काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. 

अनेक गावात ठरल्याप्रमाणे तर काही ठिकाणी अनपेक्षीत सरपंच पदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीदेवीचामाळ येथे बागल गटाची सत्ता आली होती. या ठिकाणी ऐनवेळी महेश सोरटे यांनी शिंदे-जगताप गटाकडे जाऊन सरपंच पद मिळवले आहे. प्रत्यक्षात मात्र बागल गटाकडून ते निवडून आले होते. भोसे ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाला सरपंच पदाची संधी होती, परंतू ऐनवेळी येथे आमदार शिंदे गटाचे दिपक सुरवसे यांची सरपंच पदी तर बागल गटाच्या अमृता सुरवसे यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. गुळसडी येथेही चारही गटाचे समसमान उमेदवार निवडून आले होते. या ठिकाणी बागल गटाला सरपंच पदाची संधी होती, परंतु युतीतून सरपंच म्हणून संजीवनी अनंतराव यादव तर उपसरपंच म्हणून योगश हंबीरराव भंडारे यांची निवड झाली आहे. 

अर्जुननगर-म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायत येथे माजी आमदार नारायण पाटील गटाच्या अश्विनी प्रकाश थोरात यांची सरपंच पदी तर उपसरपंचपदी अभिमन्यु धुमाळ यांची निवड झाली आहे. या ठिकाणी शिंदे-पाटील-जगताप गटाच्या युतीतून निवडणूक झाली होती. या ठिकाणी तीनही गटाला सरपंच पदाची संधी देण्यात आली आहे. सांगवी ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाचे वर्चस्व आले असून येथे सरपंचपदी  शोभा आजिनाथ बनसुडे तर उपसरपंचपदी वैभव ज्ञानेश्वर तळे यांची निवड झाली आहे. 

गावनिहाय सरपंच, उपसरपंच पुढीलप्रमाणे… 

फिसरे : सरपंच – प्रदीप अंकुशदौंडे, उपसरपंच-लता ज्ञानदेव लटके घारगाव : सरपंच -लोचना नागनाथ पाटील, उपसरपंच – सतीश अंगद पवार, पाथुर्डी : सरपंच – अश्विनी संतोष मोटे, उपसरपंच – प्रकाश विलास खरात,  वडगाव : सरपंच – जनाबाई मोहन अंधारे, उपसरपंच – अंकुश पांडूरंग शिंदे,  मिरगव्हाण : सरपंच – शालन बाबा हाके, उपसरपंच – रामदास रोहिदास ओहोळ, दिलमेश्वर/वाघाचीवाडी : सरपंच -विजया दिलीप मोरे, उपसरपंच – अविनाथ एकनाथ राक्षे, सरपडोह : सरपंच – मालन पांडूरंग वाळके, उपसरपंच – नारायण बाळनाथ रंदवे, साडे : सरपंच – अनिता शशिकांत पाटील, उपसरपंच – मंगल अर्जुन पाटील,  श्रीदेवीचामाळ : सरपंच – महेश वसंत सोरटे, उपसरपंच – विद्याराणी दिपक थोरबोले,  नेरले : सरपंच-प्रतिभा समाधान दौड, उपसरपंच – कांचन शरद काळे, शेटफळ : सरपंच – विकास संदिपान गुंड, उपसरपंच – अन्नपुर्णा महादेव नाईकनवरे, हिवरवाडी : सरपंच – अनिता बापूराव पवार, उपसरपंच – संभाजी बारकु गुळवे 
देवळाली/खडकेवाडी : सरपंच – आशिष कल्याण गायकवाड, उपसरपंच – अश्विनी धनंजय शिंदे, आळसुंदे : सरपंच – मंगल सोमनाथ देवकते, उपसरपंच – नागनाथ गोपाळ सरवदे, केडगाव : सरपंच – वर्षा ज्ञानदेव पवार, उपसरपंच – अमोल पंढरीनाथ बोराडे, पाडळी : सरपंच – शिलावती अनिल पिंपरे, उपसरपंच – पांडूरंग परमेश्वर ढाणे, पोथरे/निलज : सरपंच – धनंजय गोपीनाथ झिंजाडे, उपसरपंच – अंकुश गंगाराम शिंदे, हिवरे : सरपंच – सुनीता दत्तात्रय माळी, उपसरपंच – मैना दिलीप फरतडे,  हिसरे : सरपंच – सोमनाथ लक्ष्मण ठोंबरे, उपसरपंच – गणेश अर्जुन जगदाळे, पांडे : सरपंच – अनिता बाळासाहेब मोटे, उपसरपंच – शिवाजी अभिमान भोसले, पोटेगाव : सरपंच- अमृता संदिप नाईकनवरे, उपसरपंच – बारीकराव रामा जगदाळे, बोरगाव : सरपंच – शारदा महादेव गायकवाड, उपसरपंच – दत्तात्रय सोपान खराडे, करंजे/भालेवाडी : सरपंच – सुनिता राजेंद्र जाधव, उपसरपंच – सोनाली पप्पू सरडे, पिंपळवाडी : सरपंच – मदन रामचंद्र पाटील, उपसरपंच – वैशाली दत्तात्रय चव्हाण, आळजापूर : सरपंच – मनिषा रविकांत घोडके, उपसरपंच – नितीन भरत गपाट, अर्जुननगर : सरपंच – अश्विनी प्रकाश थोरात, उपसरपंच – अभिमन्यु अर्जुन धुमाळ, निमगाव ह : सरपंच – लखन अरूण जगताप, उपसरपंच – श्रीकांत रामदास नीळ, जेऊरवाडी : सरपंच – माया आण्णासाहेब निमगिरे, उपसरपंच – रिक्त, ढोकरी : सरपंच – भामाबाई परमेश्वर खरात, उपसरपंच – राणी लक्ष्मण खरात, सावडी : सरपंच – शशिकला अंबादास शेळके, उपसरपंच – महेंद्र बबन एकाड, मलवडी : सरपंच – मनिषा प्रमोद कोंडलकर, उपसरपंच-पप्पू वामन कोळी, कविटगाव : सरपंच – विद्या शिवाजी सरडे, उपसरपंच – भाऊसाहेब अशोक जगदाळे, सालसे : सरपंच- सतीश आदिनाथ ओहोळ, उपसरपंच – सुदामती दशरथ घाडगे, कोंढेज : सरपंच – छाया कांतीलाल राऊत, उपसरपंच – शहाजी नाना राऊत, मांगी : सरपंच -निर्मला दत्तात्रय बागल, उपसरपंच – नवनाथ बळीराम बागल, पुनवर : सरपंच – शैला केशव शेळके, उपसरपंच – रोहिदास जाधव, बिटरगाव : सरपंच – अभिजीत तुकाराम मुरूमकर, उपसरपंच : पुजा गणेश जाधव, सांगवी : सरपंच – शोभा आजिनाथ बनसुडे, उपसरपंच – वैभव ज्ञानेश्वर तळे,  कुंभेज : सरपंच – सिंधू अंकुश गायकवाड, उपसरपंच – संजय शामराव तोरमल, शेलगाव क : सरपंच – अशोक मधुकर काटूळे, उपसरपंच – कविता सचिन वीर, गुळसडी: सरपंच – संजीवनी अनंता यादव, उपसरपंच – योगेश हंबीरराव भंडारे, सौंदे : सरपंच – लता ज्ञानदेव गायकवाड, उपसरपंच – उमेश केशव वीर, बाळेवाडी : सरपंच – नितीन हनुमंत लोंढे, उपसरपंच – निर्मला हर्षवंदन नलवडे, भोसे : सरपंच -दिपक कुंडलिक सुरवसे, उपसरपंच- अमृता प्रितम सुरवसे, कुगाव : सरपंच – कौशल्या लक्ष्मण कामटे, उपसरपंच – मन्सुर शाबुद्दीन सय्यद, पांगरे : सरपंच – विजया दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच – सचिन अरूण पिसाळ, जातेगाव : सरपंच-छगन जगन्नाथ ससाणे, उपसरपंच – अच्युतराव काशिनाथ कामटे, कोळगाव : सरपंच – तात्यासाहेब चंद्रभान शिंदे, उपसरपंच – सिंधु प्रभाकर चेंडगे रोशेवाडी : सरपंच – नंदाबाई विक्रम धायतोंडे, उपसरपंच – किशोर गौतम कांबळे, उमरड : सरपंच – राजश्री बापूचोरमले, उपसरपंच- अन्नपुर्णा संदीप बदे, झरे : सरपंच – मच्छिंद्र पांडूरंग घाडगे, उपसरपंच – सुनिता संजय कांबळे या सर्व नूतन सरपंच, उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, नारायण पाटील, बागल गटाचे दिग्विजय बागल, सावंत गटाचे सुनील सावंत या सर्वांच्या कार्यालयात नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

Related Stories

मकवान घेऊन जाणारा छोटा हत्ती कॅनोलपट्टीमध्ये पडून पित्यासह मुलीचा मृत्यू

Abhijeet Shinde

ईडी चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याने वागते

Abhijeet Shinde

सासुरवाडीत पत्नीवर जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

prashant_c

महंमद पैगंबर यांची बदनामी करणाऱ्या फ्रान्सला बायकॉट करा

Abhijeet Shinde

कलाकार घडवत कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद : तांबोळी

Abhijeet Shinde

बार्शीतील अंगद घुगे खून प्रकरणी संशयित मुलगा ताब्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!