तरुण भारत

पत्रकारांना केरोना लस देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवणार

सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या मागणीनंतर जिल्हाधिकार्यांची ग्वाही

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांच्याप्रमाणेच पत्रकारांनीही ग्राऊंडवर उतरुन प्रंटलाईनला राहून लोकसेवा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यातील पत्रकारांना कोरोना लस उपलब्ध करावी, अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाने केली. दरम्यान, सातारा जिह्यातील पत्रकारांच्या या मागणीचा प्रस्ताव आपण राज्य शासनाला पाठवणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, राहूल तपासे यावेळी उपस्थित होते. गुरुवारी जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबतचे  निवेदन देण्यात आले.

हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिह्यात कोरोनाचा कहर असताना पत्रकार ग्राऊंडवर होते. आरोग्याचा बाका प्रसंग असतानाही पत्रकार खरी व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवत होते. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाचे सर्व प्रयत्न लोकांपर्यत पोहचवले. सर्वसामान्य जनता व शासन-प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांनी या कालावधीत प्रचंड मेहनत घेवून काम केले. सातारा जिल्हय़ातील अनेक पत्रकारांनाही कोरोनासारखा दुर्धर आजार झाला तसेच चार पत्रकारांचे बळीही गेले. अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक हे  याबाबत राज्य पातळीवर प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकार्यांनी तातडीने अकराही तालुक्यातील पत्रकारांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी. 

दिपक प्रभावळकर म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून शासनामार्फत प्रंटलाईनला काम करणार्या घटकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. नर्सेस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल व शासकीय कर्मचारी यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम संपत आला आहे. त्यामुळे सातारा जिह्यातील पत्रकारांसाठीचा मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने आयोजित करावा. 

शरद काटकर म्हणाले, सातारा जिह्यातील सर्व पत्रकारांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस मिळावी. जिह्यातील अकरा तालुक्यांमध्ये याबाबत आरोग्य विभागाला कॅम्प, शिबिरे आयोजित करण्याच्या सुचना आपल्या स्तरावरुन जाव्यात. 

विनोद कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार संघानेही संपूर्ण कोरोना काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे. भविष्यातही संकटाच्या काळात आमची सहकार्याचीच भूमिका आहे. आमच्या निवेदनाची दखल घेवून आपण तातडीने कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली.

त्यावर बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, जिल्हय़ाचा कार्यभार घेतल्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. या कालावधीमध्ये जिल्हय़ातील पत्रकार बांधवांचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य झाले आहे. लसीबाबत पत्रकारांची मागणी रास्त आहे. मात्र राज्य सरकारच्या गाईडलाईनप्रमाणे अद्यापतरी पत्रकारांना लस देण्याबाबत सूचना नाही. सातार्यात पत्रकारांनी केलेली मागणी लक्षात घेवून आपण लगेचच प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, सुजीत आंबेकर, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, दिपक दिक्षीत, तुषार तपासे, ओंकार कदम, संतोष नलावडे, अमित वाघमारे, सनी शिंदे, प्रशांत जगताप, साई सावंत, विशाल गुजर, प्रतिक भद्रे, विशाल कदम, सादिक सय्यद, महेश क्षीरसागर उपस्थित होते.

Related Stories

सातारा : स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब ढेकणे बिनविरोध

datta jadhav

चेअरमन पदाच्या खुर्चीला चिटकून बसायचा माझा अट्टाहास नव्हता

Amit Kulkarni

मश्वर ग्रामीण रुग्णालय

Patil_p

राजसदरेवर स्वाभिमान दिनी विशेष कार्यक्रम

Patil_p

तपास अधिकाऱ्यांना अडकवून तो देखील अडकला, करोडोंचा भ्रष्टाचार करणारा कांबळे गजाआड

Abhijeet Shinde

पेढ्याच्या भैरोबा परिसरात रंगताहेत ओल्या पाटर्य़ा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!