तरुण भारत

पर्रीकरांचा ‘शिष्य’ काय करतोय ? युरी आलेमावने उपस्थितीत केला सवाल

प्रतिनिधी / मडगाव

राज्यातील भाजप सरकारने सर्व क्षेत्रात लुटमार चालविली आहे. त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. स्वताला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे ‘शिष्य’ म्हणणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेट्रोल व डिझेल दरवाढीवर सद्या काय करतात असा सवाल काँग्रेस पक्षाचे युवा नेते युरी आलेमाव यांनी उपस्थितीत केला आहे.

Advertisements

काल गुरूवारी कुंकळळी गट काँग्रेस तर्फे पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी कुंकळळी बस स्थानक ते कुंकळळी बाजार पर्यंत रॅली काढण्यात आली. त्यावेळी युरी आलेमाव यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगे मतदारसंघातील रिवण भागात एका सभेत आपण पेट्रोल व डिझेलवर व्हॅट कर कमी करून गोव्यातील जनतेला स्वस्त दरात पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गोव्यातील जनतेने भाजपला साथ दिली व भाजपचे सरकार सत्तेवर आले. मात्र, त्यांच्या नंतर मुख्यमंत्री झालेले व स्वताला शिष्य म्हणणारे डॉ. प्रमोद सावंत हे काय करतात. त्यांना जनतेला पेट्रोल व डिझेल का स्वस्त दरात उपलब्ध करता येत नाही असे युरी आलेमाव म्हणाले.

जेव्हा केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ केली, त्यावेळी भाजपवाले रस्त्यावर उतरले होते. मग आज पेट्रोल व डिझेल सर्व सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर पोचले असताना सुद्धा भाजपचे कार्यकर्ते गप्प का ? असा सवाल ही त्यांनी उपस्थितीत केला आहे. पेट्रोल व डिझेलची वाढ करून भाजप सरकारने गोव्यातील जनतेला चांगलीच भेट दिलेली आहे. त्याची परत फेढ 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीवेळी जनता योग्य प्रकारे करणार असल्याचा विश्वास ही त्यांनी यावेळी केला.

गोव्यात काँग्रेस पक्ष मजबूत होत आहे. युवा काँग्रेस व महिला काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले कार्य करीत आहे व काँग्रेस पक्षच गोव्यातील जनतेला न्याय देणार असल्याचे मत देखील यावेळी युरी आलेमाव यांनी व्यक्त केले. रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीत युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, कुंकळळी गट काँग्रेसचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी रॅलीच्या अग्रस्थानी पेट्रोल व डिझेल नसलेल्या कारला धक्के मारून ती हाकली जात होती.

Related Stories

दुमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्यामुळे आगोंद नदी प्रदूषित

Amit Kulkarni

काणकोणातील किनाऱयांवर देशी पर्यटकांची गर्दी

Patil_p

आडपई गावात, उत्साहाला उधाण ..!

Amit Kulkarni

वळपे येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- कॉलिस वाहनाची समोरासमोर धडक

Amit Kulkarni

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

Amit Kulkarni

‘अच्छे दिन’ च्या नावाखाली भाजपकडून जनतेची लूट

Patil_p
error: Content is protected !!