तरुण भारत

दाबोळीत रेलमार्गाच्या दुपदरीकरणात स्थानिकांची मालमत्ता सुरक्षीत

मंत्री माविन गुदिन्हो यांनी केली रेलमार्गाची पाहणी

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

दाबोळीचे आमदार व राज्याचे वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी मतदारसंघातील दुपदरीकरण होणाऱया रेल्वे लाईनची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारीही होती. या पाहणीत दाबोळी मतदारसंघात दुपदरीकरणामुळे कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्री गुदिन्हो व स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दाबोळी मतदारसंघातील रेल्वेचे दुपदरीकरण होणाऱया संपूर्ण पट्टय़ाचे मंत्री गुदिन्हो यांनी सर्वेक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत रेल विकास निगम लिमिटेडचे उप सरव्यवस्थापक बॅनर्जी, विभाग अभियंते नवीन पॉल, रेल्वे उड्डाण बांधकाम तज्ञ सतिष कुमार तसेच स्थानिक पंचायतीचे सरपंच व पंच सदस्य उपस्थित होते. या मार्गात होणाऱया रेल्वे दुपदरीकरणामुळे कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान होणार नसल्याचे निदर्शनास आले. या कामांसंबंधी मंत्र्यांनी रेल्वेच्या अधिकाऱयांना काही सुचना केल्या. तसेच शांतीनगर व नवेवाडे भागाला जोडणाऱया अत्यंत महत्वाच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामालाही सुरवात करण्याची सुचना त्यांनी अधिकाऱयांना केली. त्यांनी यावेळी वीज खात्याच्या अधिकाऱयांनाही लोकांची गैरसोय टाळण्यासाठी वीज खांब हलवण्याचे काम प्राधान्या हाती घ्यावे अशी सुचना केली. मंत्र्यांनी दाबोळी भागातील नियोजित रेल्वे दुपदरीकरणाची पाहणी करून लोकांच्या मनातील चिंता दूर केल्याने या भागात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मंत्र्यांनीही यावेळी समाधान व्यक्त केले.

Related Stories

राज्यात ‘ब्लॅक फंगस’चे 10 रुग्ण

Amit Kulkarni

डय़ुरँडमध्ये गोकुळम केरळ, आर्मी रेड संघ उपान्त्यपूर्व बाद फेरीत

Amit Kulkarni

सोंण्ये पालये परिसरात तीव्र पाणी टंचाई

Amit Kulkarni

सासष्टीत कोरोना सकारात्मक रूग्णांच्या संख्येत वाढ

Omkar B

कळंगुटमध्ये वाढत्या गुन्हेगारीला स्थानिक आमदार लोबो व पोलीस निरीक्षक रापोझ जबाबदार- माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा

Amit Kulkarni

कोरोना : 257 बाधित, 4 बळी

Amit Kulkarni
error: Content is protected !!