तरुण भारत

शरद पवारांसारख्या भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नयेत

  • गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर बोचरी टीका

ऑनलाईन टीम / जेजुरी : 


जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचेे औपचारिक अनावरण उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केेलेे.

Advertisements

या दरम्यान, गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचार्यांमधे झटापट देखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, अखंड भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठे काम केले आहे. त्यांचा पुतळा उभारण्याचे चांगले काम संस्थानने केले आहे. या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. पण महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचे म्हणणे आहे की, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणे हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे आहे.

आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही. मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये, असे पडळकर यांनी म्हटले आहे. शरद पवारांना माझे आव्हान आहे की तुम्ही या पुतळ्याचे उद्घाटन करु नये, असेही पडळकर म्हणाले.


ते म्हणाले की, शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा. कारण त्यांच्या आणि अहिल्याबाई यांच्या विचारात फार तफावत आहे. त्यामुळे आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळ्याच्या पायावर माल्यार्पण करुन उद्घाटन झाले असे जाहिर करतो. 

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे प्रयत्न करा

triratna

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Shankar_P

इचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे

Shankar_P

मध्यप्रदेशात ट्रक अपघातात 5 ठार, 11 जखमी

datta jadhav

घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ

triratna

युवा पिढीने समाजकार्यासाठी पुढाकार घ्यायला हवा : आमदार मुक्ता टिळक

pradnya p
error: Content is protected !!