तरुण भारत

सांगली : जिल्हा वार्षिक योजनेच्या 320 कोटीच्या आराखड्यास मान्यता

प्रतिनिधी / सांगली

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 230.83 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत 89.17 कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 320 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

Advertisements

यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरूण लाड, मानसिंग नाईक, विक्रम सावंत, अनिल बाबर, सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

आटपाडीत पीडब्ल्यूडी अधिकार्‍यांना कोंडले; हायवेचे काम पुन्हा पाडले बंद

Abhijeet Shinde

चोरीस गेलेला १६ लाखांचा बकरा कराडात सापडला

Abhijeet Shinde

सांगली : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक कवी संमेलन उत्साहात

Abhijeet Shinde

पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Abhijeet Shinde

वारणाली मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या आयुक्तांनी दिल्या सूचना

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये बेदाणा व्यापाऱ्याची फसवणूक: साडेचार लाखाला लावला चुना

Sumit Tambekar
error: Content is protected !!