तरुण भारत

पुणे विभागातील 5 लाख 76 हजार 44 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे :


पुणे विभागातील 5 लाख 76 हजार 44 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 98 हजार 283 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 6 हजार 83 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.70 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 91 हजार 69 रुग्णांपैकी 3 लाख 77 हजार 521 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 4 हजार 515 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.54 टक्के आहे.


पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 590 आहे. पुणे जिल्हयामध्ये 421, सातारा जिल्हयामध्ये 79, सोलापूर जिल्हयामध्ये 71, सांगली जिल्हयामध्ये 4 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 15 रुग्णांचा समावेश आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 22 हजार 379 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 98 हजार 283 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पुणे विभागातील 56, 414 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

कोरोना : महाराष्ट्रात 8,998 नवे बाधित; 60 जणांचा मृत्यू

pradnya p

भाजप विमुक्त भटक्या जमाती आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी राजेश धोत्रे

pradnya p

मोदी सरकारची कामगिरी प्रभावी : चंद्रकांत पाटील

datta jadhav

कोरोना : राज्याच्या चिंतेत वाढ, नवे ८२ रुग्ण पॉझिटिव्ह

triratna

महाराष्ट्रात सोमवारी 3,001 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p
error: Content is protected !!