तरुण भारत

सांगली : नागप्रेमींकडून जखमी नागास जीवदान!

प्रतिनिधी / शिराळा

बांबवडे ता. बत्तीस शिराळा येथे शेतात काम चालू असताना, एक नाग जखमी झाला होता. त्या जखमी नागास शिराळा येथील नागप्रेमींमुळे जीवदान दिले.

बत्तीस शिराळा येथे शेतामध्ये जेसीबीचे काम चालु असताना नाग जखमी अवस्थेत सापडला. याबद्दल कासेगावचे सनी बेडेकर यांनी फोन करून नागप्रेमिंना माहिती दिली. ही माहिती मिळताच सचिन घाडगे, रोहीत मोहिते, सुरज कांबळे आणि तुषार कदम यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तर त्या जखमी नागास पशुवैद्यकीय दवाखाना शिराळा येथे उपचार केले. त्यामुळे या नागास जीवदान मिळाले. गेल्या महिन्यात बिऊर येथे रस्त्याचे काम सुरू असताना नाग जखमी झाला होता. त्याला बंटी नांगरे -पाटील आणि वनविभागाने उपचार केले होते. शिराळकरांचे नागप्रेम जगजाहीर आहे. आजपर्यंत हजारो नागांना यामुळे जीवदान मिळाले आहे.

Related Stories

जीएसटी वार्षिक विवरणपत्रे ९ आणि ९ सी दाखल करण्यासाठी मुदतवाढ

Abhijeet Shinde

गूळ भेसळीसाठी उत्पादकांना जबाबदार धरा

Abhijeet Shinde

धनगर आरक्षण लढ्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून 10 लाखाची मदत

Abhijeet Shinde

सांगली : चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा

Abhijeet Shinde

मिरज शासकीय रूग्णालयात बालरूग्णांसाठी कोरोना सेंटर सज्ज

Abhijeet Shinde

कोयना, वारणा फुल्ल; नदीकाठ धास्तावला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!