तरुण भारत

सावंतवाडीत विज्ञान प्रदर्शन

रोटरी क्लब, भोसले नॉलेज सिटीचे आयोजन : शाळांमध्ये जाऊन प्रतिकृतींचे परीक्षण

वार्ताहर / सावंतवाडी:

Advertisements

सावंतवाडी रोटरी क्लब आणि भोसले नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 24-25 फेब्रुवारीला प्रत्येक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर बऱयाच कालांतराने शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन 2021 चे आयोजन करण्यात येत असल्याचे रोटरी अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ आणि भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

डॉ. नवांगुळ म्हणाले, पाचवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात हे प्रदर्शन घेण्यात येईल. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱया शाळा गुगल फॉर्मद्वारे किंवा व्हॉट्सऍपद्वारे आपल्या संघाची नावनोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रतिकृती 23 फेब्रुवारीपर्यंत आपल्या शाळेतच तयार करून ठेवायच्या आहेत. 24 व 25 फेब्रुवारीला तज्ञ परीक्षकांची टीम सहभागी शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष प्रयोगांची पाहणी करेल. तसेच प्रतिकृतींचे चित्रिकरणही करेल.

दोन्ही गटातून प्रथम तीन क्रमांक निवडले जातील. या तिन्ही विजयी क्रमांकांना सावंतवाडी येथील समारंभात मान्यवरांच्या हस्ते 28 फेब्रुवारीला अनुक्रमे 1001, 501, 301 रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी सर्व शाळांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. विज्ञान प्रदर्शनाचे विषय – 1. पर्यावरण संरक्षण 2. अपारंपरिक ऊर्जा 3. जल शुद्धीकरण व स्वच्छता 4. रोगप्रतिबंधक उपाययोजना (उदा. कोविड विषाणूपासून संरक्षण योजना इं.) 5. सेंद्रीय शेती व फायदे असे आहेत. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी दिलीप म्हापसेकर (8550975242) व नितीन सांडये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी राजेश रेडीज, दिलीप म्हापसेकर, वसंत करंदीकर उपस्थित होते.

जिमखाना मैदानावरील बाळासाहेब ठाकरे ज्ञानबोधिनी येथे 28 फेब्रुवारीला समारोप होणार आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, रोटरी प्रांतपाल संग्राम पाटील उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

आचऱयात सापडला चक्क पाण्यावर तरंगणारा दगड

NIKHIL_N

आमदार वैभव नाईकांची अवस्था ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’!

NIKHIL_N

जुस्तीन नगर येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या

Ganeshprasad Gogate

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान

Patil_p

होमक्वारंटाईनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा दापोलीत मृत्यू; यंत्रणा सतर्क

triratna

शहरातील कोविड सेंटरला नागरिकांचा विरोध कायम

Patil_p
error: Content is protected !!