तरुण भारत

इलेक्ट्रिक स्कूटर बनविणार रोबोट

‘ओला’ची तामिळनाडूच्या प्रकल्पात  नव तंत्रज्ञान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ऍपच्या मदतीने कार सेवा देणाऱया ओला कंपनीचा तामिळनाडूमध्ये काराखान असून कंपनी तेथे इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करण्यासाठी रोबोट आणि स्वयंचलीत तंत्रज्ञानावर आधारीत करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार या नव तंत्रज्ञानाचा वापर करुन आगामी काळात इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करण्यात येणार आहे.

येणाऱया महिन्यामध्ये हे उत्पादन सुरु करण्याचे संकेत आहेत. यामध्ये ओला पेEिटग आणि वेल्डिंग प्रक्रियेसोबत कारखान्यातील मुख्य उत्पादन प्रक्रियेसाठी एबीबी ऑटोमेशन टेक्नॉलॉजीच्या वापरासोबत रोबोटचा वापर वाढविणार असल्याची माहिती आहे.

एबीबीसोबत भागीदारी

उपलब्ध माहितीनुसार ओला आपल्या तामिळनाडूमधील स्कूटर कारखान्यामध्ये रोबोटिक्स आणि स्वयंचलीत तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार आहे. यासाठी ओलाने जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एबीबीसोबत भागीदारी केली आहे. या कंपनीच्या मदतीने उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता मजबूत बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

ईपीएफओकडून 10 लाख दावे निकाली

Patil_p

ऍपलसह इतर अमेरिकेतील उत्पादने रोखली

Patil_p

रिलायन्सची 15 जुलैला बैठक

Patil_p

कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ

Patil_p

‘टेलीग्राम’ डाऊनलोडमध्ये ठरले सरस

Patil_p

सरकारने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात योजनेसाठी मागविले अर्ज

Patil_p
error: Content is protected !!