तरुण भारत

आंतरजिल्हा बदलीमध्ये सिंधुदुर्ग येणारच!

आमदार कपिल पाटील यांची ग्वाही : प्राथमिक शिक्षक भारतीने दिली माहिती

प्रतिनिधी / ओरोस:

Advertisements

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने आंतरजिल्हा बदली पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्गचा समावेश व्हावा. यापूर्वी बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती करण्यात यावी, आदी विविध प्रश्नांसाठी आमदार कपिल पाटील, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयीन भेट घेण्यात आली. सकारात्मक चर्चा झाली असून पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्गचा समावेश निश्चितपणे करून घेतला जाईल, अशी ग्वाही आमदार कपिल पाटील यांनी दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक भारतीकडून देण्यात आली.

पालकमंत्र्यांनी या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता शैक्षणिक धोरणातील निकष बदलण्यासंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, कोकणातील आमदार यांची बैठक घेऊन स्वतंत्र शैक्षणिक धोरण राबविणे तसेच 100 टक्के शिक्षक पदे भरण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटी दरम्यान 19 फेब्रुवारी 2019 चे शून्य ते दहा पटावर एकच शिक्षक कार्यरत ठेवावा, हे शालेय शिक्षण विभागाचे पत्र रद्द करावे व संच मान्यता होत नसल्याने अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन होत नाही म्हणून संचमान्यतेसाठी टॅब उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावर त्वरित निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

2018-19 व 2019-20 ची रखडलेली शिक्षक संचमान्यता ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करून व मुख्याध्यापकांना कार्यरत पदावर गृहित धरून आंतरजिल्हा बदली रिक्त पदांची टक्केवारी कळविण्याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन पत्र ग्रामविकास विभागाकडून लवकरात लवकर प्राप्त करून देण्याचे व पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्गचा समावेश करूनच देणार, असे ठोस आश्वासन आमदार कपिल पाटील यांनी भेटीदरम्यान दिले.

अप्रशिक्षित शिक्षकांच्या वरि÷ वेतन श्रेणीचा प्रश्न ग्रामविकास मंत्री व  शिक्षणमंत्री यांच्यासमवेत होणाऱया राज्य संघटनेच्या बैठकीत मांडून त्यासाठी  आवश्यक असणारा निर्णय करून घेण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी राज्याध्यक्ष नवनाथ गोड, राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, दोडामार्ग सचिव सखाराम झोरे, वेंगुर्ले अध्यक्ष वसंत गर्कळ, कार्याध्यक्ष (वेंगुर्ले) ईश्वर थडके, कणकवली महिला प्रतिनिधी रुपाली जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 450/

Related Stories

जिल्हय़ात 6 विद्यार्थी ‘शंभर नंबरी’

Patil_p

सहा महिन्यांच्या बाळाला टाळय़ांच्या गजरात डिस्चार्ज

Patil_p

एस.टी. मोफत प्रवासासंदर्भात रत्नागिरीत अद्यापही आदेश नाही

Patil_p

रत्नागिरी जिल्हय़ाच्या तापमानात वाढ

Patil_p

कणकवली तालुक्यात शाळेची घंटा अर्धीच वाजली

NIKHIL_N

विरोधकांकडून न.पं.च्या बदनामीचा प्रयत्न!

NIKHIL_N
error: Content is protected !!