तरुण भारत

अज्ञात जनावराकडून तीन शेळ्या, एका वासराचा फडशा

यड्राव / वार्ताहर

शहापूर येथील करांडे परिसरात एका अज्ञात जनावराने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमोल करांडे यांच्या तीन शेळ्या आणि विलास करांडे यांच्या एका वासरावर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला. ही घटना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अमोल करांडे व काही नागरिकांच्या निदर्शनास आली. पण, हे अज्ञात जनावर काय असेल, याची माहिती नागरिकांना समजली नाही. त्यामुळे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Advertisements

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रधान माळी यांच्यासह अन्य नागरिकांनी घटनेची वर्दी शिवाजीनगर पोलिस ठाण्याबरोबरच शहरातील पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधिकार्‍यांना देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याची दखल घेतली नाही. याच दरम्यान सदर घटनेची माहिती सोशल मिडियाव्दारे सर्वत्र पसरली होती. याची पालिकेचे आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांनी गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी येवून पाहणी केली.

यावेळी या घटनेची माहिती घेवून रितसर पंचनामा होण्यासाठी त्यांनी सर्व यंत्रणा राबवली. याच दरम्यान, त्यांनी सदर घटनेची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अशोक देसाई, शवविच्छेदन विभागाचे अधिकारी डॉ. ए. ए. मुल्ला यांना दूरध्वनीवरुन कळवली. यानंतर पालिकेचे स्वच्छता निरिक्षक महादेव मिसाळ, मुकादम रियाज मुल्ला यांनी मृत जनावरांचा व घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला. यानंतर मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी प्रणव जाधव, किशोर कांबळे, पांडू सोळगे, जोतिराम करांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या घटनेतील अज्ञात जनावर हे नेमके काय असावे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. नुकताच शहरातील आरगे मळा परिसरात एका कुत्र्याने वासरावर आणि बरगे मळ्यात बालिकेवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एका अज्ञात जनावराने तीन शेळ्या व एका वासरावर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भितीचे मोठे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पालिकेने मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Related Stories

मण्यार’च्या विषाला सीपीआर’चा उतारा..!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कागलमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

दोन महिन्यानंतर `कुलूप घाला’ आंदोलन

Sumit Tambekar

दारूच्या नशेत हसूर बुद्रुक येथील तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : चंदूरात मगरीचे दर्शन, नागरिकांत भीतीचे वातावरण

Abhijeet Shinde

ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!