तरुण भारत

‘वाढत्या’ जीभेची समस्या

अमेरिकेतील 3 वर्षांचा मुलगा ओवेन थॉमस याला एक अतिदुर्मिळ रोग जडला आहे. तो असा की, त्याच्या जीभेची लांबी मोठय़ा प्रमाणात वाढते. इतकी की त्याची जीभ तोंडात मावत नाही. एकदा शस्त्रक्रिया करून त्याची जीभ चांगली दोन इंच कमी करण्यात आली. तरीही ती काही महिन्यांनंतर पुन्हा वाढून तोंडातून बाहेर येऊ लागली. या विकाराला बेकविथ-वाईडमन सिंड्रोम (बीडब्ल्यूएस) असे शास्त्रीय नाव आहे. ही अशी स्थिती असते की, ती निर्माण झाली असता, शरीराच्या काही भागांची अतिशय वाढ होते. अशी शरिराच्या एखाद्या भागाची वाढ वाढ होण्याचा प्रकार 15 हजार जणांमध्ये एखाद्याच्या संदर्भात असतो, असे निरीक्षण आहे. ओवेनच्या संदर्भात या विकाराची वक्रदृष्टी त्याच्या जीभेवर पडली आहे. त्याच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत त्याची जीभ चार पट लांब आहे. यामुळे अन्नाचे चर्वण करणे, बोलणे, खाणे आदी जीभेशी संबंधित सर्व क्रिया करताना समस्या येऊ शकतात. पण सध्यातरी त्यावर शस्त्रक्रिया हा एकच उपाय आहे.

Related Stories

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा 30% पाठ्यक्रम कमी : रमेश पोखरियाल

Rohan_P

जगभरातच महागाईचा आगडोंब

Patil_p

तप्त वाळवंटात चटपटीत पदार्थाची निर्मिती मास्टरशेफची किमया

Amit Kulkarni

जपानमध्ये पंतप्रधान किशिदा यांना निवडणुकीत बहुमत

Patil_p

विशाल टेक्स्टाईल पार्कला केंद्राची संमती

Patil_p

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!