तरुण भारत

पन्हाळा तालुक्यातील पोखलेत तरुणाची आत्महत्या

वारणानगर / प्रतिनिधी

पोखले (ता.पन्हाळा) येथील युवकाने पळसाचे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. समिर सरदार मगदुम (वय २६ रा.पोखले ता.पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून या बाबतची फिर्याद समीर याचे चुलते कुमार मगदुम यांनी कोडोली पोलिसात दिली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, समीर हा अविवाहित असून. पोखले येथील धनगरवाडी नावचे शेतात पळसाचे झाडाला दोरीच्या साहाय्याने शुक्रवार ता. १२ रोजी सकाळी पावणे दहा वाजता गळफास लावल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने कोडोली उप जिल्हा रुग्णालयात हलवले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक सुतार करीत आहेत.

Advertisements

Related Stories

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल

triratna

वाढीव वीज बिलाविरोधात इरिगेशन फेडरेशन आक्रमक

triratna

बोलोली येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

triratna

फड सांभाळ तुऱ्याला गं आला….

triratna

विमान रद्द झाल्याने इंडिगो कंपनीचे व्यवस्थापक धारेवर

Patil_p

ग्रामसमितींच्या खंबीर निर्णयांमुळेच कोरोनाला लगाम

triratna
error: Content is protected !!