तरुण भारत

श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानास चांगला प्रतिसाद

उत्तर गोवा निधी समर्पण अभियान समितीची माहिती

वार्ताहर / म्हापसा

Advertisements

श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान संपूर्ण देशात 15 जानेवारी पासून सुरुवात झाली असून गोव्यातही याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गोव्यातून एकूण 10 कोटी जमा करण्याचा उद्देश असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती श्रीराम मंदिर निर्माण समिती उत्तर गोवा समितीचे रत्नाकर लेले यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राम मंदिराचा अपेक्षित खर्च अकराशे कोटी आहे. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, मंदिराच्या अवती-भवती सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहे. हे फक्त मंदिर नसून ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे असे त्यांनी सांगितले. उत्तर गोवा निधी गोळा समितीतर्फे पाऊणे दोन कोटी रुपये गोळा केले आहे. उत्तर गोव्यात 4 ते 5 कोटी गोळा करण्याचा आमचा उद्दीष्ट आहे. या निधी गोळा समर्पण अभियानात एकूण 1800 स्वयंसेवक व कार्यकर्ते काम करीत असून आतापर्यंत एकूण 80 ते 90 हजार घरापर्यंत श्रीराम मंदिर निर्माणच्या पत्रिका पोहोचल्या आहेत. असे संजय वालावलकर यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातील 302 गावापैकी 208 गावापर्यंत हे अभियान पोहोचले आहे. आतापर्यंत 50 टक्के अभियान पूर्ण झाले असून 15 फेब्रुवारीपर्यंत 100 टक्के पूर्ण करण्यावर आमचा भर असणार आहे. यात सर्वसामान्य भाजीवाल्यापासून धनाडय़ लोकांचा हातभार लाभत असल्याचेही ते म्हणाले.

हा निधी गोळा करण्याचा अभियान पारदर्शन असून सर्व सखोल माहिती आम्ही पुरवत असतो. यात कुठल्याच प्रकारचा गैरप्रकार केला जात नाही. कुणालीही जबरदस्ती केली जात नाही. रु. 100 ते 1 हजार पर्यंत पॅशने घेतले जातात. त्याच्यावर देण्यात येणारी निधी धनादेशाने घेतली जात आहे. यावेळी उत्तर गोवा निधी समर्पण अभियानचे आशिष शिरोडकर, प्रा. दत्ता नाईक, श्रीहरी मोरेश्वर आठल्ये उपस्थित होते.

Related Stories

फर्मागुडी-ढवळी बायपास रोडवर व्हेगनआर कलंडली

Omkar B

किनारी विभाग आराखडय़ाला बोरी ग्रामसभेत विरोध

Amit Kulkarni

… अन्यथा माल वाहतूक करू देणार नाही

Amit Kulkarni

‘शेतकरी बाझार’मध्ये रोपे, बियाणांचा खजिना

Omkar B

दूध व ऊस उत्पादकांना संघटीतपणे लढा द्यावा लागेल !

Patil_p

नववर्षात नवा ‘मटका’ आणण्याचा सरकारचा डाव

Patil_p
error: Content is protected !!