तरुण भारत

आमटे कृषी पत्तीन सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कसर्लेकर

वार्ताहर / कणकुंबी

आमटे येथील दि कणकुंबी प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत कसर्लेकर पॅनलमधून विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर हे सात विरुद्ध पाच मतांनी विजयी झाले.

Advertisements

  आमटे सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 30 जानेवारी रोजी पार पडली. त्यानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. या निवडणुकीत कसर्लेकर पॅनेलचे आठ संचालक निवडून आले होते तर अरविंद पाटील पॅनेलचे चार संचालक निवडून आले. या सर्व 12 संचालकांमधून अध्यक्षपदासाठी कसर्लेकर गटातून लक्ष्मण कसर्लेकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता तर अरविंद पाटील गटातून मारुती चिगुळकर यांनी अर्ज दाखल केला होता तसेच उपाध्यक्षपदासाठी कसर्लेकर पॅनेलचे सुभाष गावडे तर पाटील गटातून श्रीकांत गावकर यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु श्रीकांत गावकर यांचा अर्ज छाननीमध्ये रद्द झाल्याने उपाध्यक्षपदी सुभाष गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र अध्यक्षपदासाठी लक्ष्मण कसर्लेकर आणि मारुती चिगुळकर यांच्यामध्ये झालेल्या निवडणुकीत कसर्लेकर यांना सात तर चिगुळकर यांना पाच मते मिळाली. त्यामुळे सात विरुद्ध पाच मतांनी कसर्लेकर हे अध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आले.

  माजी आमदार अरविंद पाटील यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून आपली ताकद पणाला लावून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. लक्ष्मण कसर्लेकर यांनी बिनविरोध केलेल्या एका संचालिकेला आमिष दाखवून आपल्या गटात ओढून घेतले होते. तसेच बँकेच्या निरीक्षकाचे मत सुद्धा आपल्या बाजूने टाकून घेतले. परंतु कसर्लेकर गटातील संचालक मंडळाने एकनि÷पणा दाखवून अरविंद पाटील यांच्या गटाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदापासून दूरच ठेवले. जांबोटी सोसायटीसह आमटे सोसायटीच्या संचालक तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दोन्ही सोसायटीच्या निवडणुकीतून अरविंद पाटील गटाचा दारुण पराभव झाल्याने अरविंद पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला लगाम लागला आहे.

Related Stories

वकिलांच्या ‘त्या’ ठरावाला मनाई नाही

Patil_p

किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली

Patil_p

प्रधानमंत्री फसल योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

Patil_p

पथदीपांच्या समस्येबाबत माजी सदस्यांचाही कानाडोळा

Amit Kulkarni

शनिवारी 631 जण कोरोनामुक्त, 274 नवे रुग्ण चौघा जणांचा मृत्यू

Patil_p

विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!