तरुण भारत

गणेशजन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक, गणेश जागर आणि जन्म सोहळा

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच सोमवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 

Advertisements


सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत इंडियन आयडॉल फेम नंदिनी व अंगद गायकवाड हे श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. प्रात: कालीन आरती सकाळी ७.१५ वाजता होणार असून त्यादरम्यान सकाळी ७ ते १०.३० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग होईल.  


मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

Related Stories

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा – आ. राणाजगजितसिंह पाटील

Abhijeet Shinde

अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

Sumit Tambekar

OBC आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंची अनुपस्थिती

Abhijeet Shinde

आज सायंकाळी आकाशात दिसणार ‘सुपरमून’

Rohan_P

सोलापूर ग्रामीणची वाटचाल हजाराकडे

Abhijeet Shinde

महिला काँग्रेसने मंदिर, मशीद,चर्च, गुरुद्वाराला भेट देत केली प्रार्थना

Sumit Tambekar
error: Content is protected !!