तरुण भारत

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवाला धोका

नवी दिल्ली/प्रतिनिधी

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून, सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर एनएसए अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान सरदार पटेल भवनमध्ये अजित डोवाल यांचे कार्यालय आहे.

पाकिस्तानमधील हँडलरच्या सांगण्यावरुन हे सर्व केल्याचे जैशच्या दहशतवाद्याने सांगितले. २०१६ उरी सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइकपासूनच अजित डोवाल पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. उरी आणि बालाकोट दोन्ही स्ट्राइकमध्ये डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुप्तचर संस्थांमध्ये काम करताना भारतासाठी वेगवेगळया हेरगिरीच्या मोहिमा पार पाडणाऱ्या डोवाल यांच्याबद्दल अनेकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. अजितडोवाल यांना धोका असल्याचे हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

एनएसए डोवाल यांच्या जीवाला धोका असल्या बद्दल सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला सूचित करण्यात आले आहे असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिक याच्या चौकशीतून डोवाल यांच्या कार्यालय परिसराची व्हिडिओच्या माध्यमातून टेहळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हिदायत-उल्लाह मलिक शोपियनचा रहिवाशी आहे. त्याला सहा फेब्रुवारीला अटक करण्यात आली. जम्मूच्या गानग्याल पोलीस ठाण्यात मलिक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा तो प्रमुख आहे. त्याला अनंतनागमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.

Advertisements

Related Stories

दुबई एक्स्पोत 500 कोटींचा भारतीय पॅव्हेलियन

Patil_p

भारत-पाक सीमेवर 40 किलो हेरॉइन जप्त

datta jadhav

जात प्रमाणपत्र रद्द निकालात नक्कीच राजकीय खिचडी शिजलीयं – नवनीत राणा

Abhijeet Shinde

राजस्थान-बिकानेरमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप

Patil_p

अन् रडू लागले विमानातील प्रवासी

Patil_p

राज्यात दहीहंडीला परवानगी नाहीच; ठाकरे सरकारचा निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!