तरुण भारत

मुंबई होणार आता भिकारीमुक्त! मुंबई पोलिसांनी सुरू केली ‘ही’ मोहीम

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईच्या रस्त्यांवर आता तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही कारण मुंबई पोलिसांकडून आता मुंबईमधील भिकाऱ्यांविरुद्ध ‘भिक्षेकरी पकड मोहीम’ राबविण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकऱ्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.

Advertisements

भिक्षेकरी पकड मोहीम अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणाऱ्या लोकांना मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारी पासून या मोहिमेला सुरवात करण्याचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश दिले आहेत. त्यांची कोविड चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येईल.

मुंबईतील आज पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील 14 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील ‘भिक्षेकरी स्वीकार गृह’मध्ये त्याची सोय केली जाईल. तसेच या भिकाऱ्यांना भोईवाडा कोर्टात हजर केले जाणार आहे. आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

Related Stories

मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2 रुग्ण कोरोना बाधित; रुग्णांची संख्या वाढतेय

Abhijeet Shinde

सैनिक टाकळीतील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले

Abhijeet Shinde

पुसेगावात दुचाकीला ट्रकची धडक; महिला ठार

Patil_p

संचारबंदी काही अंशी शिथिल झाल्याने पोलिसांनी बॅरीकेटस् हटविले

Abhijeet Shinde

बोरगाव पोलिसांनी उघडकीस आणली हायवे रॉबरी

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,83,723 वर

Rohan_P
error: Content is protected !!