तरुण भारत

दिया मिर्झा सोमवारी पुन्हा विवाहबंधनात

39 वर्षीय अभिनेत्रीचा पूर्वीचा विवाह संपुष्टात

अभिनेत्री दिया मिर्झा 15 फेब्रुवारी रोजी उद्योजक वैभव रेखी याच्यासोबत विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. विधी आणि विवाहाच्या सोहळय़ात केवळ जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार सामील होईल. पण विवाहाच्या वृत्ताने दियाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

Advertisements

दिया आणि वैभव दोघेही दीर्घकाळापासून परस्परांना डेट करत आहेत. मुंबईतील उद्योजक असलेला वैभव वांद्रय़ाच्या पाली हिल भागात राहतो. वैभव रेखी हा सेलिब्रिटी योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीचा पूर्वाश्रमीचा पती असून दोघांना एक मुलगीही आहे.

2019 साली घटस्फोट

दियाने यापूर्वी साहिल सांगासोबत 2014 मध्ये विवाह केला होता. तर 2019 मध्ये पतीपासून विभक्त होण्याची घोषणाही केली होती. दियाचा पहिला विवाह केवळ 5 वर्षे टिकू शकला होता. दियाच्या घटस्फोटाच्या निर्णयाने तिचे चाहते हैराण झाले होते.

चित्रपटक्षेत्रातील कारकीर्द

दियाने 2000 साली मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा पुरस्कार पटकाविला होता. त्यानंतर तिने स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटापासून केली होती. स्वतःच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे दिया चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तापसी पन्नूसोबत ‘थप्पड’ चित्रपटात दिया अखेरची दिसून आली होती. सध्या दिया ‘वाइल्ड डॉग’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे.

Related Stories

कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Rohan_P

सुष्मिताने पूर्ण केले ‘आर्या 2’चे शूटिंग

Amit Kulkarni

तुझं माझं जमतंयच्या सेटवर पार्टी हो रही है!

Patil_p

‘डायनामाइट’च्या पेहरावाचा 1.18 कोटीत लिलाव

Patil_p

‘कुत्ते’मध्ये अर्जुन अन् तब्बू मुख्य भूमिकेत

Patil_p

रविनाची वेबसीरिज 10 डिसेंबरला ओटीटीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!