तरुण भारत

मेदव्हेदेव्हची चौथ्या फेरीत धडक

मेलबर्न / वृत्तसंस्था

चौथ्या मानांकित डॅनिल मेदव्हेदेव्हने पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत 28 व्या मानांकित फिलीप क्रॅजिनोविहकला पराभवाचा धक्का दिला आणि ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. येथे त्याने 6-3, 6-3, 4-6, 3-6, 6-0 अशा फरकाने विजय मिळवला. तिसरा व चौथा असे सलग दोन सेट गमावल्यानंतरही विजय मिळवता आला, याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानतो, अशी प्रतिक्रिया त्याने सामन्यानंतर व्यक्त केली. पुरुष दुहेरीत रोहन दोपण्णा मिश्र दुहेरीत पराभूत झाला आणि भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

Advertisements

मेदव्हेदेव्हचा हा सलग 17 वा विजय असून 2020 मधील शेवटची एटीपी स्पर्धा आणि रशियात मागील आठवडय़ातील एटीपी चषक स्पर्धेपासून त्याने सातत्याने विजयाचा धडाका सुरु केला आहे. मेदव्हेदेव्ह मागील वर्षातील अमेरिकन स्पर्धेचा उपजेता असून येथे तो पुढील फेरीत मॅकेन्झी मॅकडोनाल्डविरुद्ध चौथ्या फेरीत लढेल. अन्य लढतीत आंद्रे रुबलेव्हने फेलिसियानो लोपेझला 7-5, 6-2, 6-3 असे नमवले. महिला गटात ऍश बार्टीने एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाला 6-2, 6-4 असे नमवले. बार्टीची पुढील लढत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सविरुद्ध होईल. रॉजर्सने ऍनेट कोन्टावेटला 6-4, 6-3 असे नमवले.

Related Stories

निसटत्या विजयासह दिल्लीचे अव्वलस्थान भरभक्कम

Patil_p

पंडय़ा बंधू, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघात दाखल

Patil_p

सेरेनाची लढत व्हिनसबरोबर

Patil_p

संधी गमावली. बायर्न म्युनिचचा विजय

Patil_p

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा 10 ते 31 जानेवारीपर्यंत

Patil_p

विश्व करंडक फुटबॉल पात्र फेरीचे सामने लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!