तरुण भारत

सदाशिवगडावर घुमला वृक्ष संवर्धनाचा नारा

वार्ताहर/ कराड

एरव्ही ‘हर हर महादेव’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने दुमदुमणाऱया ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर शनिवारी वड, पिंपळ, बोरी आदी वृक्षांचा नारा घुमला. त्याचं कारणही तसंच होतं… 19 फेब्रुवारी रोजी साजऱया होणाऱया शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून सदाशिवगडावर 101 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत ‘वृक्षांच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करण्यात आला.

Advertisements

‘एकवेळ माणसं धोका देतील; पण झाडे कधी धोका देणार नाहीत’ असे म्हणणाऱया अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रुत आहे. आतापर्यंत 32 देवराईंच्या माध्यामातून सयाजी शिंदे यांनी राज्यभरात जवळपास साडेचार लाख झाडे लावली आहेत. आता 19 फेब्रुवारी रोजी साजऱया होणाऱया शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज्यभरातील गड-किल्ल्यांवर प्रत्येकी 391 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शनिवारी ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर 101 झाडे लावण्यात आली. यावेळी कराड नगरपालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, राज मेडिकलचे मालक सलीम मुजावर, अलंकार हॉटेलचे मालक दीपक आरबुणे, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, ज्येष्ठ गडप्रेमी सुरेश जोशी, विठ्ठल मुळीक, कैलास कदम, सतीश तावरे व गडप्रेमी उपस्थित होते. सौरभ पाटील यांच्या हस्ते सयाजी शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.

प्रारंभी सदाशिवगडाच्या पायथ्यापासून पठारावरील सदाशिवाच्या मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी ‘वडाच्या नावानं चांगभलं’, ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘येऊन येऊन येणार कोण, झाडांशिवाय हायच कोण’ अशा घोषणा देण्यात आल्या.

सयाजी शिंदे म्हणाले, ऐतिहासिक सदाशिवगडाचा झालेला विकास व राबवण्यात आलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. गडावर मुबलक प्रमाणात पाण्याची सोय असल्याने वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत सदाशिवगडाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

दरम्यान, सदाशिवगड पाणी योजनेसाठी स्वतःची विहीर देणारे बाबरमाची येथील शेतकरी विठ्ठल मुळीक, सलीम मुजावर, दिलीप दीक्षित, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे भोपळे यांच्यासह सदाशिवगडाच्या विकासासाठी हातभार लावणाऱया गडप्रेमींचा सत्कार सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Stories

जितेंद्र आव्हाडांकडून रक्तदान करण्याचे आवाहन

triratna

सातारचा पारा पोहचला 40 अंशांवर

Patil_p

सातारा : विनयभंग प्रकरणी वेणेगावच्या एकावर गुन्हा दाखल

triratna

म्हासुर्लीतील आरोग्य केंद्र इमारत खुदाईत पाईप लाईन फुटल्याने पाणीटंचाई

triratna

महाराष्ट्रातील कोविड : गेल्या 24 तासात 21,273 नवे रुग्ण; 34,370 जणांना डिस्चार्ज!

pradnya p

साताऱ्याच्या सैनिक स्कुलला मिळाला बहुमान

datta jadhav
error: Content is protected !!