तरुण भारत

टाऊनहॉलला वडापचा विळखा

प्रवेशद्वारात वडापची वाहने लागत असल्याने नागरिकांना त्रास

वार्ताहर/ कराड

Advertisements

स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनला (टाऊन हॉल) वडापच्या वाहनांचा विळखा पडत असल्याने टाऊन हॉल झाकोळला जात आहे. तर टाऊन हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारातच वडापच्या रिक्षा व जीप लागत असल्याने टाऊन हॉलमध्ये ये-जा करणाऱया नागरिकांना अडथळा होत आहे. या ठिकाणी असलेल्या सिग्नलच्या सभोवतीही वडापची वाहने लागत आहेत.

विजय दिवस चौकापासून अग्निशमन दलाच्या कार्यालयाकडे जाणाऱया रस्त्यावर टाऊन हॉलच्या संरक्षक भिंतीलगत दिवसभर वडापच्या वाहनांची रांग लागलेली असते. यामुळे टाऊन हॉल झाकोळले जात आहे. तर या मार्गावरील वाहतुकीलाही अडथळा होत आहे. त्याचबरोबर टाऊन हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारातच वडापच्या रिक्षा लागत असल्याने टाऊन हॉलमध्ये ये-जा करणाऱया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. टाऊन हॉलच्या उत्तरेकडील बाजूच्या रस्त्याचीही तीच अवस्था आहे. या रस्त्याच्या एका बाजूला खाऊचे स्टॉल लागत आहेत. तर दुसऱया बाजूला खासगी चारचाकी वाहनांचे पार्किंग होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीलाही अडथळा होत आहे.

 टाऊन हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ व समोर विजय दिवस चौकातील सिग्नल यंत्रणा आहे. मात्र दिवसभर या दोन्ही ठिकाणच्या सिग्नलला वडापच्या वाहनांचा विळखा पडलेला असता. अनेकदा सिग्नलच दिसत नसल्याने वाहनचालकांची फसगत होत आहे. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने विजय दिवस चौक ते अग्निशमन दलाच्या कार्यालयाकडे जाणाऱया रस्त्यावरील वडाप व अतिक्रमणांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.

Related Stories

सातारा : एक अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिली नाही; संजय राऊतांचा सवाल

Abhijeet Shinde

हारूर कोरोना रूग्णांच्या प्रथम संपर्कातील 26 जण विलगीकरण कक्षात

Abhijeet Shinde

साताऱयात मारहाणीत फळविक्रेते जखमी

Patil_p

पंतप्रधान पिक विमा योजनेची चित्ररथाद्वारे जनजागृती

datta jadhav

तटबंदी संवर्धनाची मोहिम सह्याद्री प्रतिष्ठानकडून फत्ते

Patil_p
error: Content is protected !!