22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

नव्याने बांधण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी सरपंच, आमदारांची धाव

प्रतिनिधी / म्हापसा

वेरे वळात येथे वेरे पंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन गावातील नागरिकांची पाण्याची सोय व्हावी यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या विहिरीचे रीतसर उद्घाटन गावचे सरपंच केदार नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे 6 लाख खर्चून ही विहीर बांधण्यात आली असून वेरे पंचायतीच्या पंचसदस्यांनी स्वतः 6 लाख रुपये उभे करून ही विहीर बांधली असल्याची माहिती यावेळी सरपंच केदार नाईक यांनी दिली.

यावेळी उपसरपंच सुस्मिता पेडणेकर, पंच सुभाष पेडणेकर, विरेंद्र शिरोडकर, सुरज चोडणकर, सिया नागवेकर, फेलिक्स रॉड्रीगीस, राजेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच केदार नाईक यांनी सर्वांचे आभार मानून सर्व पंच सदस्यांच्या सहकार्याने ही विहीर त्वरित बांधणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांचे सहकार्य यापुढेही असेच राहू दे असे ते म्हणाले. गावात पाण्याची समस्या जटील असून या विहीरीमुळे पाण्याचा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले.

दरम्यान या विहिरीचे दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान उद्घाटन सरपंच केदार नाईक यांनी केल्यानंतर अर्ध्या तासात त्याठिकाणी अमदार जयेश साळगावकर आले. यावेळी त्यांच्यासमवेत फादर वाझ व फादर मारिओ उपस्थित होते. आमदारांनी याच विहिरीचे फित कापून उद्घाटन केले. त्यामुळे येथे स्थानिक पंचायत व स्थानिक आमदार यांच्यामध्ये काहीतरी चाललेय हे स्पष्ट झाल्याचे दिसून आले. सायंकाळी या विहिरीचे उद्घाटन आमदार करणार असल्याचा सुगावा पंच सदस्यांना लागल्यावर आमदार येण्यापूर्वीच या पंच सदस्यांनी एकत्रित येऊन सरपंचांच्याहस्ते उद्घाटन करून हा कार्यक्रम आटोपता घेतला. त्यानंतर आमदार घटनास्थळी आले व त्यांनी फित कापून आपल्या परीने उद्घाटन करून घेतले.

Related Stories

कोरोना लसीकरणासाठी आठ इस्पितळे

Patil_p

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

Omkar B

निवडणूक गोवा फॉरवर्डतर्फे काणकोण मतदारसंघातून लढविणार

Patil_p

आमदार क्लाफास डायस यांना संतप्त नागरिकांचा घेराव

Amit Kulkarni

संसद अधिवेशनासाठी श्रीपादभाऊ दिल्लीला

Amit Kulkarni

वास्को व परिसरात संचारबंदीतही मुक्त संचार, वाहनांची वर्दळ वाढली

Omkar B
error: Content is protected !!