तरुण भारत

हल्ल्यांमुळे न्यूयॉर्कमध्ये दहशत, सुरक्षेत वाढ

न्यूयॉर्क

 न्यूयॉर्कमधील भूमिगत मार्गांवर चाकू हल्ल्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने गांभीर्य ओळखून 500 पोलिसांना तैनात केले आहे. हे हल्ले शुक्रवार सकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत झाले आहेत. एकाच व्यक्तीने हे हल्ले केल्याचा संशय पोलिसांना आहे. हल्ल्यांच्या चौकशीसाठी पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱयांचे चित्रण पडताळून पाहत आहे. शुक्रवारी मध्यरात्री क्वीन्समध्ये एका रेल्वेत मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरात चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या दोन तासांनी मॅनहॅटनच्या एका भूमिगत मार्गात महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहावरही चाकू हल्ल्याच्या खुणा होत्या. मॅनहॅटन भागातच 67 वर्षीय आणि 43 वर्षीय व्यक्तींवर चाकूने हल्ले करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भूमिगत मार्गांच्या पूर्ण जाळय़ात 500 अतिरिक्त अधिकारी तैनात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Advertisements

Related Stories

बायडेनचा पहिला वार सौदी अरेबियावर

Amit Kulkarni

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱयाची हत्या

Patil_p

‘ब्रेक्झिट’वर अखेर समझोता

Omkar B

उत्तर तैवानमध्ये शक्तीशाली भूकंप

Patil_p

फ्रान्स : स्थिती बिघडली

Patil_p
error: Content is protected !!