तरुण भारत

आंध्रप्रदेशमध्ये भीषण दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू

कुर्नूलमध्ये बस अन् ट्रकची धडक – 4 जण गंभीर

वृत्तसंस्था/ कुर्नूल

Advertisements

आंध्रप्रदेशच्या कुर्नूलमध्ये रविवारी सकाळी बस-ट्रकच्या धकडेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी मुले असून यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. कुर्नूलपासून 25 किलोमीटर अंतरावरील मदारपूर गावानजीक पहाटे साडेतीन ते 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली असून मृतांमध्ये 8 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बस चित्तूर जिल्हय़ामधून राजस्थानच्या अजमेरला जात होती. दुर्घटनेत 4 मुले बचावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. फकीरप्पा यांनी दिली आहे.

प्रारंभिक तपासात बस रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यावर उलटली आणि रस्त्याच्या दुसऱया बाजूने येणाऱया ट्रकला जाऊन धडकल्याचे आढळून आले आहे. बसमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव कर्मचाऱयांना यंत्रांचा वापर करावा लागला आहे. पोलिसांनी आधारकार्ड आणि वाहनात मिळालेल्या अन्य दस्तऐवजांच्या मदतीने पीडितांची ओळख पटविली आहे.

Related Stories

आरटीजीएसची सुविधा आता चोवीस तास

Patil_p

लसीवरही विरोधी पक्षांकडून राजकारण !

Patil_p

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ रुग्णालयात दाखल

Rohan_P

देशात 15 लाख बाधितांची नोंद

Patil_p

डॉल्फिन प्रकल्पाला 15 दिवसांमध्ये प्रारंभ

Patil_p

देशात 67 हजार 708 नव्या बाधितांची नोंद

Patil_p
error: Content is protected !!