तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 14 कोरोना रूग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी गेल्या 24 तासांत 14 नवे रूग्ण दिसून आले, त्यात शहरातील 8 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात चौघेजण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1729 आहे. रविवारी 14 नवे रूग्ण मिळाले. दिवसभरात 210 जणांची तपासणी केली. चौघे कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 229 झाली आहे. शेंडा पार्क येथील लॅबमधून 695 रिपोर्ट आले. त्यातील 673 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 36 रिपोर्ट आले.

त्यातील 35 निगेटिव्ह आहेत. ट्रनेटचे 106 रिपोर्ट आले, त्यापैकी 98 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहर 8 व अन्य 0 असे 14 रूग्ण आहेत. नव्या 14 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 99 झाली आहे. चौघे कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.

जिल्ह्यात 14 नवे रूग्ण, 4 कोरोनामुक्त,
पॉझिटिव्ह रूग्ण 14, कोरोनामुक्त 4, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 099
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 229
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 141
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1729
गेल्या 24 तासांत 210 संशयितांची तपासणी

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

शिरोळ नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदासाठी 23 रोजी परीक्षा

Abhijeet Shinde

रस्ते खुदाईवरुन सत्ताधारी गटातच ठिणगी

Abhijeet Shinde

बेळगाव निवडणूक : मराठी माणसाचा पराभव नव्हे तर लोकशाहीची हत्या

Abhijeet Shinde

स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्राची निर्मिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!