तरुण भारत

सूरतमध्ये 48 फूट लांबीचा रामसेतू केक

राम मंदिरासाठी बेकरीचालकाची मोठी देणगी

देशवासीय अयोध्येत उभारल्या जाणाऱया राम मंदिराकरता योगदान देत असताना सूरतच्या बेडलिनर बेकरीकडून एक अनोखा पुढाकार घेण्यात आला आहे. ब्रेडलिनर बेकरीने 11-16 फेब्रुवारीपर्यंत ‘प्रत्येक पाऊल रामाकरता’ संकल्प मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून मिळणारी रक्कम राम मंदिरासाठी दिली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत सूरतमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात रामसेतूच्या प्रतिकाच्या स्वरुपात 48 फूट लांबीचा केक तयार करण्यात आला आहे. या केकवर भगवान श्रीरामाचे 16 गुण लिहिण्यात आले असून लोकांना यातील एक गुण तरी अंगिकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राम मंदिरासाठी बेकरीचे सर्व कर्मचारी एक दिवसाचे वेतन म्हणजेच 1,01,111 रुपयांचे योगदान देणार आहेत.

Advertisements

Related Stories

नववर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त

datta jadhav

लेझर गाइडेड टँकविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

datta jadhav

देशातील 11 राज्यात 101 ओमिक्रॉनबाधित

Patil_p

दिल्लीत दिवसभरात कोरोनाचे 44 नवे रुग्ण; 37 डिस्चार्ज!

Rohan_P

हुतात्मा संतोष यांची पत्नी उपजिल्हाधिकारी

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 444 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

Rohan_P
error: Content is protected !!