तरुण भारत

‘परग्रहवासीयां’च्या पाऊलखुणांचा शोध घेतोय अमेरिका 1947 युएफओ क्रॅश

परग्रहवासीय असतात की नाही, ही चर्चा जुनाट असली तरीही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युएफओ (अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स) शोधण्याचे काम सोडलेले नाही. कोसळलेल्या युएफओच्या अवशेषांचा शोध घेतला जात असल्याची पुष्टी पेंटागॉनने दिली आहे. 1947 मध्ये न्यूमेक्सिकोत रोजवेल क्रॅशच्या ढिगाऱयात युएफओचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानण्यात येते.

माणसांपासून दूर तंत्रज्ञान

Advertisements

पेंटागॉनच्या दस्तऐवजानुसार युएफओत वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानात अशा प्रकारची सामग्री वापरण्यात आली आहे, ज्याची माणसांना कल्पना देखील नाही. सामग्रीचे परीक्षण नेवाडाच्या बाइगलो एअरोस्पेस नावाची कंपनीत केले जात आहे.  रोजवेलमध्ये मिळालेल्या धातूला ‘मेमरी मेटल’ म्हटले गेले होते. त्याला पाहणाऱया लोकांनुसार फोल्ड केल्यावरही हा धातू स्वतःचे जुने स्वरुप पुन्हा प्राप्त करू शकत होता.

गोष्टी करायचा गायब

अहवालानुसार यात ‘मेटामटेरियल’चा उल्लेख असून जो उच्च स्तरीय अभियांत्रिकीत वापरला जातो. याला धातू आणि प्लास्टिकच्या आच्छादनाने तयार केले जाते. दस्तऐवजाच्या आधारावर स्वतःचे जुने स्वरुप आठवण्यासह हे मटेरियल गोष्टींना गायब करू शकते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीला कंप्रेस करू शकते आणि प्रकाशाचा वेग मंदावू शकते असा दावा ब्लॉगर अँथनी यांनी केला आहे.

Related Stories

व्हिएतनाममध्ये पूर-भूस्खलनाचे संकट

Patil_p

नायजेरियात ट्विटरची जागा घेणार ‘कू’

Amit Kulkarni

8 कोटी लोक उपासमारीच्या वाटेवर

Patil_p

तालिबानची अफगाण क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसखोरी

datta jadhav

विनामास्क सेल्फी; चिलीच्या राष्ट्राध्यक्षांना 2.5 लाखांचा दंड

datta jadhav

जर्मनीत नियंत्रण

Omkar B
error: Content is protected !!