तरुण भारत

डोनाल्ड ट्रम्प सिनेटकडून दोषमुक्त

पुरेसा पाठिंबा नसल्याने महाभियोग फसला

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

Advertisements

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या सिनेटमध्ये चालविण्यात आलेली महाभियोग कारवाई अयशस्वी ठरली आहे. काही आठवडय़ांपूर्वी कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसाचाराला ते जबाबदार आहेत, असा आरोप ठेवून ही कारवाई करण्यात येत होती. शनिवारी या कारवाईवर मतदान घेण्यात आले. मात्र आवश्यक दोन तृतियांश पाठिंबा मिळाला नाही.

हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया नंतर ट्रम्प यांनी व्यक्त केली. महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने 100 पैकी 57 तर विरोधात 43 मते पडली. महाभियोगाच्या बाजूने 67 मते पडणे आवश्यक होते. मात्र, तेवढी मते जमा करण्यात डेमॉक्रेटिक पक्षाला यश आले नाही. त्यामुळे या तांत्रिक कारणास्तव ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, असे घोषित करण्यात आले.

सिनेटमध्ये मतदान पक्षीय निष्ठेनुसारच झाले. सभागृहात डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षाची प्रत्येकी 50 मते आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या 50 पैकी 7 सदस्यांनी ट्रम्प दोषी असल्याच्या बाजूने मतदान केले. मात्र, तेवढे संख्याबळ पुरेसे नव्हते. त्यामुळे ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक भविष्यात लढवू शकतात, असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले. ट्रम्प यांच्यावरची ही महाभियोगाची दुसरी कारवाई होती. तसेच माजी अध्यक्षावर महाभियोग चालविण्याची ही अमेरिकेच्या इतिहासातील प्रथमच वेळ होती.

Related Stories

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 20 लाखांचा टप्पा

datta jadhav

9.7 कोटी लोकसंख्या, शून्य कोरोनाबळी

Patil_p

फेसबुकवर भडकले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

Amit Kulkarni

फायझर लस नव्या कोरोनालाही मारक

Patil_p

कॅथरीन रुबिंस करणार अंतराळातून मतदान

datta jadhav

मेक्सिकोत पुन्हा निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!