तरुण भारत

राजीव कला मंदिरच्या ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेत नागेशी-बांदोडाचे ‘स्वामी’ प्रथम

स्व. रविंद्र लक्ष्मण नाईक स्मृतीप्रित्यर्थ पहिली राज्यस्तरिय ऐतिहासिक नाटय़ स्पर्धा

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरच्या स्व. रविंद्र लक्ष्मण नाईक स्मृती प्रित्यर्थ पहिली  राज्यस्तरीय ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेत नागेशी बांदोडा येथील चौरंग नागेशी मंडळाचे ‘स्वामी’ नाटय़प्रयोगाला रु. 40 हजार चे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. राजीव कला मंदिरच्या मां. दत्ताराम नाटय़गृहात 20 जाने ते 12 फेब्रु. दरम्यान झालेल्या नाटय़स्पर्धेत एकूण 22 नाटकांचे सादरीकरण झाले.

स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक मदनंत सावईवेरेच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ यांना रू. 35000, तृतीय पारितोषिक मडकई येथील वैरागी कलावृक्ष संस्थेच्या ‘ही श्रींची इच्छा’ यांना रू. 30000 चे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. त्याशिवाय प्रासादिक नाटय़ मंडळाच्या ‘करीन ती पुर्व’, श्री खामिणी नाटय़ मंडळ सावईवेरेच्या ‘शहा शिवाजी’ तसेच नाटयतरंग म्हापसाच्या ‘आकाशमिठी’ यांना अनुक्रमे  प्रथम रू. 25000, द्वितीय रू. 20000, तृतीय रू. 15000 अशी उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

उत्कृष्ट दिग्दर्शनसाठी प्रथम-संदीप तुकाराम वेरेकर (इथे ओशाळला मृत्यू), द्वितीय-शशिकांत नागेशकर (स्वामी), तृतीय-जयानंद नागेशकर (ही श्रींची इच्छा) यांना प्रथम रु. 5000, द्वितीय रु. 4000, तृतीय रु. 3000 अशी पारितोषिके प्राप्त झाली.

उत्कृष्ट अभिनय पुरूष प्रथम-गौतम दामले (माधवराव-स्वामी), द्वितीय दिगंबर नाईक (बाजी-करीन ती पुर्व), तृतीय प्रशिल कामत (माधवराव-ही श्रींची इच्छा). उत्कृष्ट अभिनय स्त्री प्रथम-रेश्मा नाईक (येसूबाई-इथे ओशाळला मृत्यू), द्वितीय-साक्षी नागेशकर (रमाबाई-ही श्रींची इच्व्छा), तृतीय शर्मिला नाईक (गजरा-करीन ती पुर्व), उत्कृष्ट बालकलाकार प्रथम श्रयोग सतरकर (संभाजी-गरूडझेप), द्वितीय-वैश्रव गोविंद गावडे (राजाराम-रायगडाला जेव्हा जाग येते).

उत्कृष्ट नेपथ्य प्रथम-सौरभ वेरेकर (इथे ओशाळला मृत्यू), द्वितीय-सुरूजीत च्यारी (स्वामी), उत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम-श्रीनिवास उसगांवकर (इथे ओशाळला मृत्यू), द्वितीय-संदेश वेरेकर (शहा शिवाजी), उत्कृष्ट ध्वनीसंकलन प्रथम-सरीता मणेरीकर (करीन ती पुर्व), द्वितीय-सिंधुराज कामत (स्वामी), उत्कृष्ट वेशभूषा प्रथम-बाबाजी घाडी (आकाशमिठी),  द्वितीय अनिल घाडी (ही श्रींची इच्छ़ा) उत्कृष्ट रंगभूषा प्रथम-हिमालय गावडे (स्वामी), द्वितीय-एकनाथ नाईक (इथे ओशाळला मृत्यू) यांना वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली. त्याशिवाय प्रशस्तीपत्रकासाठी कुमार शरण्य नाईक, विर सु.गोकर्णकर, संदीप दयानंद फडते, परेश खेडेकर, सदानंद नाईक,भालचंद्र उसगांवकर, दिलीप प्रभू पाऊसकर,नितेश नाईक, गोविंद मराठे, जितेंद्र परब, साबाजी मोपकर, विठ्ठल परब, निळकंठ खलप, स्नेहल गुरव, शारदा भगत, रसिका मळीक, सुनया नाईक, हरीचंद्र नाईक, शिवनाथ नाईक, निलेश नाईक,सुरज गावणेकर, विशाल गवस, संजय नाईक, नितीन नाईक, मुकुंद नाईक, गिरीष सावईकर, मिलिंद सावंत, मकरंद परब, विश्वजीत परब यांना प्रशस्तीपत्र प्राप्त झाली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल शेट रायकर, रामदास कृष्णा परब व चंद्रकांत फटी गावस यांनी काम पाहिले. ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेचा निकाल काल रविवारी कला मंदिर येथे जाहीर करण्यात आला. यावेळी कला मंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, सदस्य सचिव  स्वाती दळवी, गौरी कामत, जुझे गोएश व गिरीष वेळगेकर उपस्थित होते.

Related Stories

भर रस्त्यात भरणारा चोपडेचा मासळी बाजार अपघातास देतोय निमंत्रण

GAURESH SATTARKAR

रेल्वेतून येणाऱया बिगर गोमंतकीयांची चाचणी, कोरोंटाईन सशुल्क

Omkar B

विधानसभा अधिवेशनात 751 प्रश्न

Amit Kulkarni

ब्रह्माकुमारीतर्फे वानरमाऱयांना मदत

Omkar B

टाळेबंदीच्या काळात सोलये खनिज खाणीमधीर रस्ता रुंदीकरण स्थानिकांनी बंद पाडले

Omkar B

मेळावलीवासियांवर अन्याय होऊ देणार नाही

Patil_p
error: Content is protected !!