तरुण भारत

परिट सेवा मंडळाचा समाजभूषण आणि अष्टपैलू पुरस्कार जाहीर

ऑनलाईन टीम / पुणे :

परिट सेवा मंडळ, पुणेच्यावतीने समाजभूषण आणि अष्टपैलू पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा समाजभूषण पुरस्कार नंदकुमार कदम, अशोक भागवत यांना तर अष्टपैलू पुरस्कार कृष्णा खंडाळे व सुधाकर यादव यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळा मंगळवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी वधू वर परिचय विशेषांक २०२१ चे देखील प्रकाशन होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड यांनी दिली. 

Advertisements


कसबा पेठेतील संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन वास्तूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वास्तू उभारणीच्या योगदानातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, उद्योजक रमाकांत कदम, दिव्यांग कल्याणकारी विभाग महाराष्ट्र सरकारचे उपायुक्त संजय कदम, परीट सेवा मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार व कवयित्री अमृता खाकुर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


कार्यक्रमात सुरेश नाशिककर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत शिंदे, शिवाजी पवार, बाळासाहेब भोसले, छाया ठाणेकर, बाबासाहेब जाधव, बबन पवार, नाना आदमाने, पुष्पा भोसले यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कै. मोहन जाधव यांचा सन्मान हेमा जाधव स्विकारणार आहेत तर कै. सुर्यकांत शिंदे यांचा सन्मान अंजली शिंदे स्विकारणार आहेत.

Related Stories

“आमोल मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी”, मंत्रालयात जाताना गाडी फोडू, मनसेची धमकी

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गुरुवारी 8 हजार पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

पोलिसांनी रोखल्याने मानखुर्द चेकपोस्टवर सदाभाऊ खोत यांचे ठिय्या आंदोलन

Sumit Tambekar

”अजितदादा… जरा सांभाळून बोला, आम्ही फाटक्या तोंडाचे , बोलायला लागलो तर महागात पडेल”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Abhijeet Shinde

आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात – आरोग्य मंत्री टोपे

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर

Rohan_P
error: Content is protected !!