तरुण भारत

कळंबावासीयांचे आराध्य दैवत ‘श्री वृक्षगणेश’

प्रतिनिधी / कोल्हापूर

शहरापासून अवघ्या काही अंतराव असलेल्या कळंबा गावाजवळ झाडातला गणपती पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. मंदिराच्या मागील बाजूस असणारा कळंबा तलाव, सभोवती असणारी हिरवीगार शेती अशा निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या या मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस कळंबा गावासह आजूबाजूच्या परिसरातील गणेशभक्तांची गर्दी वाढत आहे.

Advertisements

नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती संबंध कळंबा पंचक्रोशीत झाली आहे. त्यामुळे संकष्टी, गणेशजयंतीसह इतर दिवशीही भक्तांची येथे मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. सोमवारी होणाऱ्या गणेश जयंतीनिमित्त मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळा, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कळंबा-गारगोटी रस्त्यालगत असणाऱ्या एका अर्जन वृक्षाच्या बुंध्यामध्ये रमेश नरके यांना गणपतीचा आकार दिसला. सुरूवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण त्यांच्या मनामध्ये कायम गणपतीच्या आकाराबद्दल विचार येऊ लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अखेर त्यांनी त्या आकाराचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. तयांना हा आकार गणपतीच्या आकारासारखाच असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या मित्रांना, कुटुंबीयांना याची कल्पना दिली. सुरूवातीला सर्वांनीच रमेश नरके यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी आपली श्रध्दा आपणजपावी, ती इतरांवर लादू नये, या उक्तीप्रमाणे नरके यांनी झाडातील गणपतीची नित्य पूजा करण्यास सुरूवात केली. गणपतीवर असणारी त्यांची निष्ठा पाहून गावकऱयांनाही यातील गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर हा गणपती सर्वसामान्य झाला. नरके कुटुंबीयांबरोबरच सारे गावकरीह या गणपतीची पूजा करू लागले. हळूहळू या वृक्षगणेशाची महती सर्वदूर पसरली. त्यामुळे संकष्टी आणि गणेश जयंतीला या वृक्षगणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली.

रमेश नरके यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ उमेश नरके यांनी येथील पूजेचे नित्यकर्म पुढे सुरूच ठेवले. भक्तांच्या सुविधेसाठी येथे एक शेड उभारण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ‘वृक्षगणेशा’च्या दर्शनासाठी येतात. अनेकांना या ठिकाणी मानसिक समाधान मिळते. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या `वृक्षगणेशाचे’ दर्शन घेण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासीदेखील क्षणभर थांबतात. वृक्षगणेशाची रोजची पूजाअर्चा, संकष्टी आणि गणेश जयंतीचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टी उमेश नरके भक्तिभावाने करत असतात. या कामात तयांना त्यांचा मुलगा ओंकार, ऍड. नंदकुमार पाटील, दयानंद शिंदे हे मोलाचे सहकार्य करतात. या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा नरके यांचा मानस आहे.

गणेशजयंतीनिमित्त यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजता महाअभिषेक, त्यानंतर 9 वाजता होमहवन, सत्यनारायण पूजा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी गणेश जन्मोत्सव सोहळा आािण् महाआरती होईल. त्यानंतर कळंबा गावचे सरपंच सागर भोगम, उपसरपंच संगीता तिवले, कार्यकारी अभियंत दीपक महाजन, ऍड. के. के. सासवडे, वाशी गावच्या ग्रा. पं. सदस्य दीपाली पाटील, प्रकाश पाटील, शशिकांत तिवले, संपत नरके, ऍड. नंदकिशोर पाटील, दयानंद शिंदे, शिवाजीराव यादव, प्रमोद शहा आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सागर पाटील यांनी दिली.

विशेष सत्कार

अनाथांना मदतीचा हात देणारे, बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करणारे, मानवसेवा सेकंड इनिंग होम्स् कोल्हापूर या संस्थांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

बहुगुणी अर्जन वृक्ष

वृक्षगणेश ज्या झाडामदये आहे, त्याला `अर्जन वृक्ष’ म्हणून संबोधले जाते. धावडा कोहा, काहू अर्जन, येरामड्डी अशा विविध नवानेही हे झाड ओळखले जाते. नदी, ओढा, झरे यांच्या किनाऱयावर हा वृक्ष आढळून येतो. या वृक्षाची साल औषधी असल्याचे सांगितले जाते. या वृक्षाला धार्मिक महत्त्वही आहे. अनेक पौराणिक कथा या वृक्षाशी जोडल्या आहेत. भगवान विष्णू आणि श्री गणेशाला या वृक्षांची पाने वाहिली जातात.

महाप्रसाद होणार नाही

कोरोना पार्श्वभूमिवर शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याकारणाने यावर्षी महाप्रसाद होणार नसल्याचे पुजारी उमेश नरके यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भाविकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून दर्शनाचा भाविकांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Stories

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर होणार उड्डाणपूल

triratna

कोल्हापूर हायकर्सच्या मावळ्यांनी सर केला आव्हानात्मक लिंगाणा

triratna

कोल्हापूर : कुंभोज येथील वारणा नदी परिसरात पुन्हा केबल चोरीला सुरुवात

triratna

कोल्हापूरकरांना दिलासा, दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही

Shankar_P

पर्यावरण आणीबाणी जाहीर करा; मानवी साखळीद्वारे इचलकरंजीत जनजागृती

triratna

शिवाजी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनास प्रारंभ

triratna
error: Content is protected !!