तरुण भारत

बसस्थानकातील व्यापारी गाळय़ांची उभारणी युद्धपातळीवर

कारवार बसस्थानक होणार हायटेक

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. स्थानकाच्या परिसरात गाळय़ांची उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बसस्थानकाच्या निवाराशेडचे कामही सुरू करण्यात आले आहे. पण रेल्वेस्थानकासमोरील गेट बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना स्वच्छतागृहाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण आणि विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्थानकासमोरील बसस्थानकाचा विकास करण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतले आहे. कारवार बसस्थानक अशी ओळख असलेल्या जुन्या बसस्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे. त्याकरिता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी निवाराशेड आणि व्यापारी गाळे उभारण्यात येणार आहेत. परिसरात सध्या बारा गाळे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे बसस्थानकाचे निवाराशेड उभारण्यासाठी पाया खोदाई करण्यात आली आहे. या ठिकाणी आठ बस एकाच वेळी थांबण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शहराच्या दक्षिण भागातील गावे आणि विविध शहरांना ये-जा करणाऱया बस या ठिकाणी थांबतात. त्यामुळे बस प्रवाशांची गर्दी होत असते. प्रवाशांचा विचार करून या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. सदर बसस्थानक हायटेक होणार आहे. बसस्थानकाचा विकास करण्यात येत असल्याने रेल्वेस्थानकासमोरील प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ये-जा करणाऱया बस रेल्वेस्थानकासमोर थांबविण्यात येत आहेत. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने बसस्थानक आवारातील स्वच्छतागृहाचा वापर प्रवासी करीत असतात. पण गेट बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना  स्वच्छतागृहाची अडचण भासत आहे. त्यामुळे येथील गेट थोडय़ा प्रमाणात खुले ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आमदार अनिल बेनके यांनी  कंत्राटदाराला सूचना केल्या होत्या. मात्र, याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी प्रवाशांची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यापुरते प्रवेशद्वार खुले करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

गोमटेशजवळील ‘त्या’ गळतीकडे पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

कोरोनाचा नायनाट कर, समृद्ध जीवनाची दिशा दे !

Patil_p

जयभारत फौंडेशनची कॅन्टोन्मेंटला मदत

Patil_p

लॉकडाऊन काळात लोंढा मिरज रेल्वे मार्गावर चार पुलांची पुनर्बांधणी

Patil_p

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

Amit Kulkarni

पॅसेंजर रेल्वेअभावी प्रवाशांचे हाल

Patil_p
error: Content is protected !!