तरुण भारत

सोलापूर : पतीच्या खून प्रकरणात पत्नीस जामीन मंजूर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा

करमाळा येथे पतीच्या खून प्रकरणी पत्नीस जामीन मंजूर झाला आहे. गेल्या वर्षी १२ ऑगस्ट २०२० ला अनिल मोरे यांचा करमाळा जामखेड रोड वर मृतदेह आढळून आला होता. हा खून अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याने व मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता अनिल मोरे यांनी कट करून केलेला असल्याचे निष्पन्न झाले होते.

याबाबत हकीकत अशी की, गेल्या वर्षी १२ ऑगस्ट २०२० ला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करमाळा जामखेड रोड वरील हॉटेल हिंदवी समोर असणारे डांबरी रोडच्या कडेला खड्ड्यामध्ये एक इसम अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा मयत अवस्थेत आढळून आली असल्याची माहिती हॉटेल मालक गजानन यादव यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे दिलेली होती. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले व घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या जबाबावरून सदरील इसम हा अनिल मोरे (रा. मु.पो जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड) येथील रहिवासी असून त्याचा खून अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याने व मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता अनिल मोरे यांनी कट करून केलेला असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर अभिजीत बुचडे व संगीता मोरे या दोघांना १६ ऑगस्ट २०२० रोजी अटक करण्यात आली होती. यातील आरोपी गीता मोरे हिने जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांच्यासमोर झाली. यानंतर आरोपी संगीता अनिल मोरे हिची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यात आरोपी नंबर दोन मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता मोरे तिच्या वतीने ॲड निखिल पाटील, ॲड विक्रम सातव, ॲड दत्तप्रसाद मंजरतकर, यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षाच्यावतीने ॲड पी ए बोचरे यांनी काम पाहिले.

Related Stories

आता विद्यार्थी शिकणार पाऊस मोजायला !

Abhijeet Shinde

सोलापूर : कै. विठ्ठल भाऊंचा शेतकरी सेवेचा वारसा विठ्ठलगंगा फार्मर्स कंपनीने जपावा – आमदार शिंदे

Abhijeet Shinde

सोलापूर : बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची धावपळ

Abhijeet Shinde

सोलापूरचं टेंशन वाढलं, आज १७ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

प्रशासन, यात्रेचे मानकरी यांच्या संयुक्त बैठकीतून घेणार सिद्धेश्वर यात्रेचा निर्णय : आयुक्त

Abhijeet Shinde

आघाडी सरकार न हालणारे, न डोलणारे फक्त हप्ते वसुल करणारे – देवेंद्र फडणवीस

Sumit Tambekar
error: Content is protected !!