तरुण भारत

उत्तराखंडात 54 नवे कोरोना रुग्ण, 15 दिवसानंतर एकाही रुग्णांचा मृत्यू नाही

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात 15 दिवसानंतर पहिल्यादांच एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर मागील 24 तासात  54 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर केवळ एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 96,820 इतकी झाली आहे.

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 7,052 नमुने निगेटिव्ह आले. तर 15 दिवसानंतर पहिल्यांदाच एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. यापूर्वी 29 जानेवारीला देखील एकाही रुग्णाने कोरोनामुळे आपला जीव गमावला नव्हता. 

प्रदेशात काल 54 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये देहरादून मध्ये 26 नवे रुग्ण आढळून आले. हरिद्वार 9, उधमसिंह नगर 6, नैनिताल 12 आणि चंपावतमध्ये एक रुग्ण आढळून आला. तर अन्य 8 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 93,061 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.12 % इतके आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून सद्य स्थितीत 687 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Related Stories

भारतीय मुलीला जागतिक पुरस्कार

Patil_p

गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

Patil_p

वाराणसीमध्ये आणखी 18 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

झोपडपट्टीमध्ये शिरला ट्रक, 8 जणांचा मृत्यू

Patil_p

नारायण राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Abhijeet Shinde

चोवीस तासात ‘कोरोना’मुळे 26,382 बाधित, 387 मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!