तरुण भारत

लावाची विस्ताराची जय्यत तयारी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

मोबाईल निर्मितीत असणारी भारतीय हँडसेट कंपनी लावाने 2021 मध्ये पूर्ण तयारीनिशी बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेची (पीएलआय) मदत घेत लावा आपल्या व्यवसाय विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. चिनी उत्पादनांच्या तोडीसतोड उत्पादने सादर करण्यासाठी लावाची धडपड येत्या काळात दिसणार आहे.

विवो आणि ओप्पो या दोन कंपन्यांनी आपल्या ब्रँडचे महत्त्व जाहिराती व इतर माध्यमातून लोकांमध्ये अधिक लोकप्रिय केले आहे. साधारण हाच टेंड किंवा इतर भिन्न टेंडसच्या माध्यमातून लावाला आपला विस्तार भारतात अधिक नेटाने करायचा आहे. विवो, ओप्पो यांनी इंडियन प्रीमियर लीग, प्रो कबड्डी यांना पुरस्कर्ते राहून आपली लोकप्रियता वाढवली आहे. पण लावा कंपनीने मात्र लोकप्रियता वाढवण्याबाबत वेगळा मार्ग अनुसरण्याचे निश्चित केले आहे. पुरस्कर्ते होऊन  जास्तीचा खर्च करण्यापेक्षा कंपनी इतर मार्ग अवलंबणार आहे. कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगले स्मार्टफोन्स बाजारात आणण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. डिजिटल माध्यमाचा वाढता वापर लक्षात घेऊन स्मार्टफोन्सना बाजारात आणण्याचे प्रयत्न कंपनीकडून केले जाणार आहेत.

इतर बाजारपेठांचा शोध घेऊन त्याठिकाणी विक्रीचे जाळे वाढवायची तयारी लावा कंपनीने केली आहे. एवढंच नाही तर भारताव्यतिरिक्त आफ्रिका आणि पश्चिम आशिया देशातही आपल्या उत्पादनांना सादर करण्याची तयारी कंपनीने केली आहे.

किती घेणार उत्पादन

वर्षाला पाच कोटी इतके स्मार्टफोन्स कंपनी तयार करते आहे. येणाऱया काळामध्ये दोनशे कोटी रुपये उत्पादनासाठी खर्च केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. त्याचप्रमाणे येत्या वर्षात 3 हजार जणांना रोजगार मिळवून दिला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

गणतंत्रदिन कार्यक्रमाची जय्यत सज्जता

Patil_p

होन्नावर तालुक्यातील बंदर प्रकल्पाला विरोध

Omkar B

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

triratna

सोलापुरात आज नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; रुग्णांची संख्या 390

triratna

मेक्सिकोत भूकंप; त्सुनामीची शक्यता

datta jadhav

जम्मू-काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला सरकारची मान्यता

Shankar_P
error: Content is protected !!