तरुण भारत

स्मार्टफोन्सच्या विक्रीत 10 टक्के वाढीची आशा

5 जी फोन्स 3 कोटी येणारः वनप्लस, रियलमींची जय्यत तयारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

यंदा भारतीय स्मार्टफोन्सची बाजारपेठ 10 टक्क्यांनी विकसित होणार असल्याचा अंदाज मार्केट रिसर्च फर्म सीएमआर यांनी वर्तवला आहे. दुसरीकडे 5 जी फोन्सची जहाजाद्वारे होणारी वाहतुक 3 कोटींवर पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीएमआरच्या माहितीनुसार 5 जी नेटवर्क सेवा 2022 च्या अखेर किंवा 2023 च्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच वनप्लस आणि रियलमी यासारख्या कंपन्या 5 जी युक्त स्मार्टफोन्स बाजारात तेजीने लाँच करण्याची घाई करतील.

2021 आणि त्यानंतर स्मार्टफोन इंडस्ट्रित तेजीचा सूर दिसून येईल. यातही 5 जी सेवा बहाल झाल्यावर 5 जीयुक्त स्वस्त स्मार्टफोन्स बाजारात आणण्याची स्पर्धा विविध कंपन्यांमध्ये रंगलेली दिसेल. अशा फोन्सच्या मागणीत एकदम वाढ दिसून येईल. यात 20 हजार रुपये किंमतीचेही स्मार्टफोन्स असतील.

वनप्लसचा वाटा 58 टक्के

5 जी गटातील स्मार्टफोन्सच्या बाजारात चिनी कंपनी वनप्लसचा दबदबा चांगलाच वाढलेला दिसून आला आहे. कंपनीने बाजारात या गटात 2020 मध्ये 58 टक्के इतका वाटा उचललेला आहे. तर ऍपलचा वाटा 20 टक्के इतका आहे. यात आयफोन 12चाही समावेश आहे. याच महिन्याच्या सुरूवातीला रियलमीने भारतीय बाजारात एक्स 7 5जी आणि एक्स 7 प्रो 5 जी स्मार्टफोन दाखल केला होता. आता भारतात 5 जी गटात स्मार्टफोन्समध्ये कंपनीला आघाडीचे स्थान काबीज करायचे आहे.

Related Stories

देशाची स्मार्टफोन निर्यात 1.5 अब्ज डॉलर्सवर ?

Patil_p

लावाचे 2 फिचर फोन्स भारतात दाखल

Patil_p

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला होणार सादर

tarunbharat

ब्रिटनने भारतासह अन्य देशांच्या मदतीने आखली 5-जी क्लब योजना

Omkar B

इनफिनिक्स झिरो 8 आय बाजारात

Patil_p

ऍमेझॉनवर सॅमसंगचा सर्वात महाग स्मार्टफोन

tarunbharat
error: Content is protected !!