तरुण भारत

सिक्कीम सीमेवरही नरमला चीन

नाकु ला येथे गस्तीचे प्रमाण केले कमी

वृत्तसंस्था/ गंगटोक

Advertisements

पूर्व लडाखमध्ये मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव आता कमी होताना दिसून येत आहे. पँगोंग सरोवरावर भारतीय सैन्य आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या संयुक्त पुढाकारानंतर चीनची भूमिका आता नरमाईची दिसून येत आहे. याचमुळे चीनने सिक्कीमच्या नाकु ला येथेही स्वतःची गस्त कमी केली आहे. मे महिन्यापासून सीमेवर दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

भारत सरकारने नाकु ला संबंधी सध्या कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे. सैन्याच्या वरिष्ठ कमांडर्सनुसार पँगोंग सरोवरासंबंधी दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान झालेल्या करारानंतर चीनकडून नाकु ला येथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीनच्या सैन्याशी संबंधित प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सैन्य आयोगाला आहे.

पँगोंग सरोवरासंबंधी झालेल्या चर्चेनुसार दोन्ही देशांचे सैन्य पूर्वस्थितीत परतणार आहे. चीनचे सैन्य उत्तर काठात फिंगर 8 च्या पूर्व दिशेच्या असेल. तर भारतीय सैन्याच्या तुकडय़ा फिंगर 3 नजीकच्या धनसिंग थापा पोस्टवर असणार आहे. तर दक्षिण काठावरूनही सैन्य अशाप्रकारचे पाऊल उचलणार आहे.

देपसांग क्षेत्रावर चर्चेची तयारी

चीनसोबत पँगोंग सरोवरासंबंधीच्या बोलणीनंतर भारत आता देपसांग क्षेत्रासंबंधी चर्चा करण्याची तयारी करत आहे. कमांडर स्तरीय बैठकीत या क्षेत्राकरता मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारत या बैठकीत देपसांगचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Related Stories

लखनऊ : डिफेन्स एक्स्पोला आजपासून सुरूवात

prashant_c

टिक टॉक वर अमेरिकेच्या लष्कराची बंदी

prashant_c

पंतप्रधान मोदींना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार

Amit Kulkarni

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये बाधितांची संख्या 1,41,736 वर

Rohan_P

हिमाचलमध्ये खिचडी निर्मितीचा विक्रम

Patil_p

भारतात 68,898 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 29 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!