22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

जानेवारी महिन्यात निर्यातीत वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जानेवारीत भारताच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. ही निर्यात 27.45 अब्ज डॉलर्स इतकी असून ती गेल्या वर्षाच्या जानेवारीपेक्षा 6.16 टक्क्यांनी जास्त आहे. जानेवारीत आयातीतही गेल्या जानेवारीपेक्षा 2 टक्के वाढ झाली असून आयात 42 अब्ज डॉलर्स आहे. यामुळे व्यापारी तूट जानेवारीत 14.54 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ही माहिती केंद्र सरकारने दिली आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत भारताची निर्यात 13.58 टक्क्यांनी घटलेली असून ती 228.25 अब्ज डॉलर्स होती. याच कालावधीत आयातही 25.92 टक्क्यांनी घटलेली असून ती 300.26 अब्ज डॉलर्स होती, अशीही माहिती देण्यात आली.

Related Stories

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 071 वर

pradnya p

युरोपप्रमाणेच भारतातही रस्ते वेगवान होतील!

Patil_p

उत्तराखंडात 1,391 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

pradnya p

बोधगयामधील हॉटेलमध्ये चीनी पर्यटक आणि वस्तूंना बंदी

pradnya p

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

अवघ्या 100 रूपयांमध्ये…

Patil_p
error: Content is protected !!