तरुण भारत

केएल राहुल मानांकनात दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ दुबई

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या टी-20 फलंदाजांच्या मानांकनात भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज केएल राहुलने दुसऱया स्थानावर झेप घेतली असून कर्णधार विराट कोहलीने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. आयसीसीच्या टी-20 पुरूषांच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान 915 गुणांसह पहिल्या स्थानावर असून भारताचा केएल राहुल 816 गुणांसह दुसऱया, ऑस्ट्रेलियाचा फिंच 808 गुणांसह तिसऱया, पाकचा कर्णधार बाबर आझम 801 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. कोहली 697 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत भारताच्या दोन फलंदाजांनी पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे. दरम्यान टी-20 प्रकारातील गोलंदाजांच्या आणि अष्टपैलूंच्या मानांकन यादीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूंचा समावेश नाही. गोलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेच्या शम्सीने दुसरे स्थान मिळविले आहे. अलिकडेच पाकने दक्षिण आफ्रिकेचा टी-20 मालिकेत 2-1 पराभव केला आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने 6 गडी बाद केले होते. गोलंदाजांच्या मानांकन यादीत अफगाणचा रशीद खान पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा आदील रशीद दुसऱया आणि अफगाणचा मुजीब उर रेहमान तिसऱया स्थानावर आहे. टी-20 सांघिक प्रकारात पाकचा संघ 260 गुणांसह चौथ्या तर दक्षिण आफ्रिका 251 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Related Stories

आयपीएल स्पर्धेची रुपरेषा आज निश्चित होण्याची शक्यता

Patil_p

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बालेवाडी संकुल सज्ज

Patil_p

बायर्न म्युनिचला मोसमातील दुसरे जेतेपद

Patil_p

सर्व सदस्यांची चाचणी निगेटिव्ह : चेन्नई सुपरकिंग्सला दिलासा

Patil_p

आर. विनयकुमारचीही निवृत्तीची घोषणा

Patil_p

उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा सहभाग

Patil_p
error: Content is protected !!