तरुण भारत

विठ्ठल नामाची शाळा भरली…

क्रेनवरील कर्मचाऱयांना दिले धडे, कारवाई नियमानुसार करण्याच्या दिल्या वाहतूक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी सूचना

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

गेल्या चार दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या समोर नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलताना वाहनधारक आणि क्रेनवरील कर्मचारी यांच्यात चांगलीच वादावादी झाली. त्या वादावादीचे चित्रीकरण झाल्याने सगळय़ा साताऱयात वाहतूक शाखेच्या क्रेन बाबत तिखट प्रतिक्रिया उमटल्या. तब्बल पाच ते सहा दिवस वाहतूक शाखेच्या दोन्ही क्रेन बंद होत्या. आज क्रेनवरील सर्व कर्मचाऱयांचे प्रशिक्षण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिले.

वाहतूक शाख्होची क्रेन आली की वाहनधारकांच्या मनात धडकीच भरते. आपल्या गाडीला काही होणार नाही ना याची. गाडी उचलून थेट प्रेंनमध्ये कशीही भरली जाते. क्रेनमध्ये गाडी भरताना ती कशाही पद्धतीने टाकली जाते. त्यामुळे गाडीचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या चार दिवसपूर्वी तहसील कार्यालयाच्या समोर एका वाहनधारकाची गाडी उचलताना शाब्दीक चकमक उडाली. थेट गाडीच्या चालकाची आणि गाडी उचलणाऱया कर्मचाऱयाची धराधरी झाली. गाडीवरील वाहतूक पोलिसांनी या घटनेचे चित्रीकरण केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच अनुषंगाने सातारकरांची अगोदरच वाहतूक शाखेच्या क्रेनबाबत नाराजी असताना हा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त केले. त्यावरुन तबल चार दिवस वाहतूक शाखेच्या दोन्ही क्रेन बंद होत्या. आज पुन्हा त्या क्रेन सुरु करण्यापूर्वी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी क्रेन वरील कर्मचाऱयांना सर्वसामान्य नागरिकांशी कसं वागायच, कस बोलायचे याचे धडे दिले. नो पार्किंगमध्ये जे वाहन आहे तेच नियमानुसार उचलायचे. ज्या वाहनधारकांनी वाद घालयाला सुरुवात कली असेल त्या वाहनधारकांशी वाद न करता डय़ुटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱयास याची माहिती द्यावी. जेणे करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

सांगलीतील ‘त्या’ घटनेवरून अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा

Abhijeet Shinde

अपुऱया वैद्यकीय अधिकाऱयांबाबत 2 आठवडय़ात म्हणणे द्या!

Patil_p

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी एसओपी करा

Rohan_P

महावितरणकडून राधानगरी धरणाचा वीज पुरवठा खंडित

Sumit Tambekar

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे तर अनिल परबांना स्वत:हून अटक करा; चंद्रकांतदादांचा पलटवार

Abhijeet Shinde

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक

Patil_p
error: Content is protected !!