तरुण भारत

वीजबिल भरण्यासाठी तीन-चार टप्पे द्या

पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी/ खेड

Advertisements

वीजबिलांचा विषय केवळ कोकणचा नसून संपूर्ण राज्याचा आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले. त्यातच निसर्ग वादळात मोठी हानी झाली. या पार्श्वभूमीवर वीजबिल भरण्यासाठी तीन ते चार टप्पे द्या, अशा मागणीचे निवेदन उर्जामंत्री नितीन राऊत यांना दिल्याची माहिती पर्यटन राज्य मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

 तालुक्यातील पोयनार-पाटीलवाडी येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या, बहुतांश वीज ग्राहक ग्रामीण भागातील असून कोरोना संकटामुळे रोजगार बुडाला, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने तीन ते चार टप्प्यात वीजबिले भरण्यासाठी मुभा देण्याच्या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करायला हवा.

 पोयनार धरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून जिल्हय़ातील पर्यटनस्थळांचा विकास साधण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा राज्यमंत्री तटकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, रायगडचे जिल्हा प्रभारी अजय बिरवटकर, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, शहराध्यक्ष सतिश चिकणे, युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, युवकचे तालुकाध्यक्ष अश्विन भोसले, विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजिब रूमाणे आदी उपस्थित होते.

Related Stories

ज्यांना लक्षणे आहेत अशांची टेस्ट, सरसकट टेस्टिंग नाही- आडिवरेकर

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : गणेशोत्सवात लाखो चाकरमानी आल्यास वैद्यकीय यंत्रणेचा कणा मोडेल

Abhijeet Shinde

दोडामार्गातील जनआशीर्वाद यात्रा यशस्वी

NIKHIL_N

आंध्रमधून आलेल्या चौघांकडून चिपळुणात शेतकऱयांची फसवणूक!

Patil_p

आंतरराष्ट्रीय योगदिन युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून साजरा केला जाणार

Ganeshprasad Gogate

ग्रामस्थांनी गावात न घेतल्याने युवकावर रानात टेम्पो उभा करत राहण्याची वेळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!