तरुण भारत

काँग्रेसचे पॅनल डिचोलीवासीयांचे सेवक म्हणून निवडणुकीत उतरणार

स्वार्थी राजकारणाला फाटा, लोकांच्या समस्या सोडविण्याचा आणि मागण्या पूर्ण करण्याचा संकल्प, भ्रष्टाचार मुक्त आणि विकसनशील नगरपालिका म्हणून नाव पुढे आणणार : मेघश्याम राऊत

प्रतिनिधी / डिचोली

Advertisements

डिचोली नगरपालिका प्रभाग फेररचना पूर्ण होऊन प्रभाग आरक्षण आणि प्रभाग फेररचनाही जाहिर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने डिचोली नगरपालिका निवडणुकीत आपले पूर्ण क्षमतेने पेनल रिंगणात उतरविण्याचा पक्का निर्णय केला असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर ते स्वतःच्या स्वार्थासाठी प्राधान्याने कार्यरत न राहता “डिचोलीवासीयांचे सेवक” बनून काम करणार. भ्रष्टाचार मुक्त आणि विकसनशील नगरपालिका असे नाव कमवून डिचोली नगरीचे नाव वर आणण्यासाठी झटणार, अशी माहिती डिचोली गट काँग्रेस अध्यक्ष मेघश्याम राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिचोली गटाचे सरचिटणीस मुस्तफ्फा बेग, उपाध्यक्ष गुरूदास हळर्णकर, मनोज मयेकर आदींची उपस्थिती होती.

डिचोलीची नगरपालिका लोकांची, पक्षाची की वैयक्तिक कोणाची ?

आज डिचोली नगरपालिकेतील राजकारण पाहिल्आस ते केवळ काही ठराविक राजकीय घटकांभोवतीच फिरत आहे. प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण नाहीतर कुटंब सदस्य किंवा आपल्या समर्थनातील उमेदवार रिंगणात उतरवितात. केवळ वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण या नगरपालिकेत चालू आहे. लोकांच्या समस्या, अडीअडचणी याबाबतचे कोणालाही काहीच पडून गेलेले नाही. केवळ खुर्ची पूरतेच संपूर्ण राजकारण सुरू आहे. या राजकारणात लोकांचे प्रश्न आणि समस्या बाजूलाच राहत आहे. यावर कोताचेही ध्यान नाही. त्यामुळे हि नगरपालिका लोकांची, राजकीय पक्षाची की वैयक्तिक कोणाची ? असा प्रश्न अनेकदा पडतो, असे मेघश्याम राऊत यांनी म्हटले.

डिचोलीचा आतापर्यंत समाधानकारक विकास नाहीच

  डिचोली नगरपालिका क्षेत्रात फेरफटका मारल्यास इतकी वर्षे होऊनही लोकांच्या मुलभूत गरजांकडे कशा पध्दतीने दुर्लक्षच करून आपलाच स्वार्थ साधण्यात वेळ वाया घालविण्यात आलेल आहे. त्याचे दर्शन घडते. अनेक ठिकाणी रस्त्यांची स्थिती भकास आहे. लोकांना पाणी पुरवठा सुरळीत नाही, गटरे उघडी सताड आहेत. डिचोली शहरातील खेळाडूंना सुसज्ज असे मैदान नाही. सध्या करण्यात आलेले सौंदर्यीकरण अर्धवट आणि योग्य रितीने केलेले नाही. राज्यात सरकार डिचोलीतील सत्ताधारी पक्षाचे असूनही या मुलभूत आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्यात हे पालिका मंडळ अपयशी ठरले आहे. ते यापुढे कसा विकास साधणार आणि लोकांचे प्रश्न कशा पध्दतीने सोडविणार याचा आता लोकांनी खोल विचार करणे आवश्यक आहे, असे मेघश्याम राऊत यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षाचे पेनल डिचोलीवासीयांचे सेवक म्हणून उतरणार.

डिचोली गट काँग्रेस या नगरपालिका निवडणुकीत पूर्ण क्षमतेने पेनल उतरविणार असून प्रत्येक उमेदवार आणि नगरसेवक हा डिचोलीवासीयांचा सेवक म्हणूनच काम करणार स्वार्थी राजकारण आणि कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या खुर्चीच्या रजकारणाला थारा दिला जाणर आही. लोकांच्या समस्या सोडविताना लोकांना विश्वासात घेऊनच कार्य केले जाणार. भ्रष्टाचार मुक्त शासन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असणार. सध्या डिचोली काँग्रेस गट समितीकडे इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारां?नी संपर्क साधला आहे. त्यापैकी काही उमेदवार काही प्रभागांमध्ये निश्चितही करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जर डिचोलीतील महिला, युवा व वरि÷ कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाकडे संपर्क साधल्यास त्यांचे सदैव स्वागतच असणार. जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला रिंगणात पूर्ण क्षमतेने आणि पाठिंब्याने उतरविले जाणार आहे. विकासात डिचोलीचे नाव वर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष वावरणार असून सर्वांनी एकत्रित येऊन डिचोलीचे नाव वर आणण्यासाठी कार्य करूया, असे आवाहन मेघश्याम राऊत यांनी यावेळी केले.

Related Stories

बोर्डे डिचोलीतील अग्निदिव्य मार्गक्रमण डोळे दिपवणारे

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या जनतेच्या समस्या

Amit Kulkarni

राजीनामानाटय़ावर पडदा पडेना

Patil_p

तीन पोलीस कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह

Omkar B

…तर मुखर्जी स्टेडियममध्ये बेड्सची व्यवस्था करणार

Amit Kulkarni

भाजप पुरस्कृत उमेदवाराना निवडून द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!