तरुण भारत

काकडे फौंडेशनतर्फे समर्थ घाटगेला पुरस्कार

बेळगाव : काकडे फौंडेशनतर्फे गंगुताई गाडगीळ सामाजिक पुरस्कार समर्थ गजानन घाटगे या युवकाला देण्यात आला. समर्थने प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचलनात भाग घेतला होता. याबद्दल फौंडेशनतर्फे लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात त्याला पुरस्कार देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मोहन इजारे आणि निवृत्त कर्नल मधुकर कदम उपस्थित होते. या दोघांच्या हस्ते व संजय काकडे यांच्या हस्ते समर्थला रोख रक्कम, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली. प्रारंभी भारतमाता पूजन करण्यात आले. तसेच पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समर्थच्या दिल्लीतील संचलनाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. गजानन घाटगे यांनी देशभक्तीगीत सादर केले. राघवेंद काकडे यांनी समर्थचा परिचय करून दिला. समर्थने बेळगाव ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन कथन केले. यावेळी जितेंद्र रेडकर व अंकिता कदम यांनाही भेटवस्तू देण्यात आली. समर्थचे आजोबा अशोक इंचल, पालक हिरा घाटगे व गजानन घाटगे यांचेही अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले.

Related Stories

उचगाव मराठी साहित्य संमेलन 24 जानेवारीला घेण्याचा निर्णय

Patil_p

उचगाव-कोनेवाडी मार्गावरील भैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठापना आज

Patil_p

शब्दविद्यातर्फे उद्या शेकोटी कविसंमेलनाचे आयोजन

Patil_p

बेळगाव-धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी 335 हेक्टर होणार जमिन संपादन

Patil_p

आतापर्यंत 62 टक्के घरपट्टी मनपाच्या खजिन्यात जमा

Patil_p

उत्तरप्रदेशच्या तोतया मंत्र्याने घेतला गोव्यात शाही पाहुणचार

Patil_p
error: Content is protected !!