तरुण भारत

विद्यार्थ्यांच्या रास्ता रोकोमुळे एकच गोंधळ

बसेस वेळेत सोडण्याची मागणी : आश्वासनानंतर रास्ता रोको मागे

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शालेय विद्यार्थ्यांना वेळेत सोडण्यात येत नाहीत. तसेच बसच्या फेऱयाही कमी आहेत. दररोज होणाऱया या डोकेदुखीमुळे सोमवार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कित्तूर चन्नम्मा चौकातील कडोली-जाफरवाडी या बस स्टॉपवर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि वाहतुकीची कोंडी झाली.

 कोरोनानंतर महाविद्यालये-शाळा सुरू झाल्या मात्र बसेस अजुनही विद्यार्थ्यांच्या वेळेत सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पालकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैतागून सोमवारी सायंकाळी अचानकपणे रास्ता रोको केला. यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी समजूत काढून विद्यार्थ्यांना हा रास्ता रोको मागे घेण्यास भाग पाडले. या घटनेमुळे वाहनचालकांचा मोठा त्रास सहन करावा लागला.

Related Stories

दूध विक्रेत्यांना पोलिसांचा त्रास

tarunbharat

सामाजिक अंतर राखण्याची सूचना कुणासाठी ?

Patil_p

यल्लम्मा मंदिर दीपोत्सवाने उजळले

Omkar B

निराधार महिलेला मनपाच्या आश्रयगृहामध्ये आधार

Amit Kulkarni

रामदुर्ग येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण

Rohan_P

कोळसा पावडर वाहतूक करणाऱया ट्रकला आग

Patil_p
error: Content is protected !!